MSRTC Bus: मलकापूरच्‍या दुर्घटनेची पुनरावृत्तीची भीती; अनेक बसेसचे पत्रा फाटलेले

मलकापूरच्‍या दुर्घटनेची पुनरावृत्तीची भीती; अनेक बसेसचे पत्रा फाटलेले
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : बुलढाण्याच्या मलकापूर येथे एसटीचा पत्रा बाहेर आल्याने पोलीस भरतीची प्रॅक्टिस करणाऱ्या दोन तरुणांचे हात कापून मोठी दुर्घटना महिनाभरापूर्वी घडली होती. त्यानंतर देखील परिवहन विभागाला (MSRTC) जाग आली नसल्याचे दिसून येत आहे. धुळ्यात (Dhule) देखील बहुतांश बसेसची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली असून बऱ्याच बसेसचे पत्रे फाटून बाहेर आले आहेत. (Live Marathi News)

Dhule News
Beed News: जिल्हाधिकारी शर्मा चिखल तुडवत थेट शेताच्या बांधावर; ढगफुटीने उध्‍वस्त पिकांची केली पाहणी

गरिबांची लालपरी म्हणून ओळख असलेल्या एसटी बसची (St Bus) सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याचे दिसून येत आहे. महिनाभरापूर्वी बुलढाण्याच्या मलकापूर (Malkapur) येथे एसटीचा पत्रा फाटून बाहेर आल्याने दोन युवकांचे हात कापून मोठी दुर्घटना घडली होती. या धक्कादायक दुर्घटनेमधून देखील परिवहन विभागाला जाग आली नसल्याचेच दिसून येत आहे.

धुळ्यातील बहुतांश एसटी बसेचे पत्रे फाटून बाहेर आले असल्याचे दिसून येत आहे. अशीच काहीशी परिस्थिती संपूर्ण राज्यभरातील एसटी बसेसची झाली आहे. बुलढाण्याच्या मलकापूर येथील घटनेची पुनरावृत्ती धुळ्यात देखील होण्याची भीती आता प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच नागरिकांना वाटू लागली आहे. मलकापूरची पुनरावृत्ती होण्याची वाट परिवहन विभाग बघत आहे का? असाच काहीसा प्रश्न खराब झालेल्या एसटी बसेसकडे बघितल्यानंतर वाटू लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com