बीएसएनएल कार्यालयात आग; लाखोंचे झाले नुकसान

बीएसएनएल कार्यालयात आग; लाखोंचे झाले नुकसान
बीएसएनएल कार्यालयात आग; लाखोंचे झाले नुकसान
बीएसएनएल

धुळे : भारत दूरसंचार निगम लि. अर्थात बीएसएनएलच्‍या कार्यालयात अचानक आग लागली. आगीत कागदपत्र जळाले असून बीएसएनएलच्‍या मालमत्‍तेचे लाखो रूपयांचे नुकसान झाल्‍याचा अंदाज वर्तविला जात आहे. (dhule-news-Fire-at-BSNL-office-Millions-were-lost--and-document)

धुळे शहरातील पोस्ट ऑफिस कार्यालयाला लागून असलेल्या बीएसएनएलच्या बिल्डिंगला अचानक आग लागल्याचे निदर्शनास आले. आगीमध्ये बीएसएनएल कार्यालयाच्या कागदपत्र कक्षाला आग लागली, तसेच बाहेर असलेल्या पत्र्याच्या शेडला देखील आग लागल्याचे दिसून आले.

बीएसएनएल
धक्‍कादायक..आईसमोरच मुलीला पाजले विष; पैशांच्या वादातून घटना

मोठा अनर्थ टळला

आगीमध्ये बीएसएनएल कार्यालयाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती अग्निशमन विभागाच्या पथकाला कळवताच अग्निशमन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. व अथक प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून या दुर्घटनेमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती बीएसएनएल अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली आहे.

Related Stories

No stories found.