पाचशे कोटी भेट नसून हा तर आमचाच थकलेला पगार..एसटी संघटनांची तीव्र प्रतिक्रीया

पाचशे कोटी भेट नसून हा तर आमचाच थकलेला पगार..एसटी संघटनांची तीव्र प्रतिक्रीया
पाचशे कोटी भेट नसून हा तर आमचाच थकलेला पगार..एसटी संघटनांची तीव्र प्रतिक्रीया
ST Worker

धुळे : राज्‍य परिवहन महामंडळातील कर्मचारींचे पगार थकित आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी महामंडळाला पाचशे कोटी रूपये भेट दिल्याची बातमी समोर आली. यानंतर संघटनांनी ही भेट नसून आमचाच थकलेला पगार असल्याचे स्पष्ट केले. (dhule-news-Five-hundred-crore-is-not-a-gift-this-is-our-tired-salary-st-worker-statement)

एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या थकीत मानधना संदर्भात नैराश्यात जाऊन आत्महत्या केल्यानंतर अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी महामंडळाला पाचशे कोटी दिले असल्याची माहिती समोर आली. हे देताना राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना गणपतीची भेट दिली असे म्हटले जात असताना याचा एसटी कर्मचाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्‍या. हे पाचशे कोटी राज्य सरकारने आम्हाला भेट दिली नसून आमचेच थकलेले वेतन आम्हास दिले आहे. तेही आमच्या दोन कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येनंतर राज्य सरकारने दिले असल्याचे एसटी संघटनांच्यावतीने सांगण्यात येत आहे.

प्रत्‍यक्ष हातात कधी पडणार

हे वेतन अद्यापही आमच्या हातात पडलेले नसून याला आणखी किती दिवस लागणार हे देखील आम्हाला माहीत नसल्याचे एसटी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले आहे.

ST Worker
केळी वाहतूकीतून रेल्‍वे कोट्याधीश; पाच महिन्‍यात मिळाले १८ कोटी

कर्मचारी आत्‍महत्‍येनंतर प्रशासन जागे

त्याचबरोबर संघटनेच्यावतीने राज्य सरकारला व महामंडळ प्रशासनाला पुढील काळात अशा पद्धतीने वेतन न देण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. अशा पद्धतीने वेळोवेळी एसटी कर्मचाऱ्यास आत्महत्या करावी लागते त्यानंतरच प्रशासन जागे होते; असा आरोप एसटी कर्मचारी संघटनेच्यावतीने लावण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com