पांझरा नदीत बुडून दोघांचा मृत्यू; धुळे शहरासह तालुक्यात जलप्रलय

पांझरा नदीत बुडून दोघांचा मृत्यू; धुळे शहरासह तालुक्यात जलप्रलय
Dhule Heavy Rain
Dhule Heavy RainSaam tv

धुळे : शहरासह तालुक्यात रविवारी मध्यरात्रीनंतर अतिवृष्टी झाली. नाले, नदीलगतचे रहिवासी पुराच्या भीतीने मध्यरात्रीपासून जागे झाले. सोमवारी सकाळपर्यंत शेकडो घरे, शेती क्षेत्रात पाणी शिरले. धुवाधार पावसामुळे (Heavy Rain) अनेक घरांची पडझड झाली. दिवसभर पुराच्या विळख्यात सापडलेल्या पीडित नागरिकांना अन्नदानासाठी अनेकांनी पुढाकार घेतला. दरम्यान, पांझरा नदीत (Panjhara River) बुडून दोघांचा (Death) मृत्यू झाला. (Dhule News Heavy Rain)

Dhule Heavy Rain
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्‍ह्यात; मुक्ताईनगरात होणार सभा

पावसाने कहर केल्याने धुळे (Dhule) शहरातील अनेक प्रमुख व वर्दळीचे मार्ग जलमय झालेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. वाडीभोकर व वलवाडी या दोन गावांचा संपर्क मोरीवरून पाणी गेल्याने खंडित झाला. मुस्लिमबहुल व देवपूरमधील नदी, नाल्यालगतची घरे पुराच्या विळख्यात सापडली. नाले, गटारी ब्लॉक झालेल्या कॉलन्या जलमय झाल्या. अशा भागात असंख्य घरांत पाणी शिरले. तेथील रहिवाशांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले.

विद्यार्थी, रुग्ण अडकले पुराच्‍या वेढ्यात

जवाहर मेडिकल फाउंडेशनचे महाविद्यालयही पुराच्या वेढ्यात सापडल्याने परिणामी चारशे विद्यार्थी व दोनशे रुग्ण, नातेवाईक अडकून पडले. वीजपुरवठा खंडित झाल्याने या ठिकाणी जनरेटरसाठी डिझेल, जीवनावश्‍यक वस्तू, नातेवाईक व विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण पथकाने बोटीचा आधार घेतला. दिवसभरात पूरग्रस्त भागातील पाणी ओसरलेले नव्हते. त्यामुळे पीडित नागरिकांचे हाल झाले. लोकप्रतिनिधींसह महापालिका, जिल्हा प्रशासन उपाययोजना राबविण्यात व्यस्त झाली. रात्री नऊनंतरही पावसाळी वातावरण कायम होते.

दोन जणांचा मृत्यू

पांझरा नदीत बुडून एका महिलेसह दोन जण पुरात वाहून गेल्याची घटना घडली. दहिवेल (ता. साक्री) येथील मंगलाबाई दिलीप सोनवणे या कुटुंबीयांसह १६ सप्टेंबरला गणेशपूरला नातेवाइकांकडे गेल्या. १७ सप्टेंबरला त्या मालपूर गावी गेल्या. तेथून पुन्हा दहिवेलला येत असताना पांझरेच्या केटी वेअर बंधाऱ्यावरून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पांझरेत वाहून गेल्या. तर दुसरी घटना दातर्ती (ता. साक्री) शिवारात घडली. मळखेडा येथील अनिकेत सुनील पवार हा तरुण रविवारी (ता. १८) पांझरेत बुडून मरण पावला. अक्कलपाडा धरणाच्या फुगावजवळील दातर्ती शिवारात पांझरा नदीत त्याचा मृतदेह आढळला. दोन्ही घटनांची साक्री पोलिसांकडे नोंद झाली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com