घरात पुराचे पाणी; समाजवादी पार्टीचे आयुक्‍त कार्यालयाबाहेर आंदोलन
Dhule Corporation

घरात पुराचे पाणी; समाजवादी पार्टीचे आयुक्‍त कार्यालयाबाहेर आंदोलन

घरात पुराचे पाणी; समाजवादी पार्टीचे आयुक्‍त कार्यालयाबाहेर आंदोलन

धुळे : पुराचे पाणी नागरिकांच्या घरात जाऊन नुकसान होत आहे. या होत असलेल्या नुकसानीबद्दल आक्रमक होत समाजवादी पार्टीतर्फे आज धुळे महापालिका आयुक्तांच्या कार्यालयातच मोर्चा नेण्यात आला. तसेच दालनाबाहेर आंदोलन केले. (dhule-news-Flood-water-house-Movement-outside-the-office-of-the-Commissioner-of-Samajwadi-Party)

शहरामधील अतिक्रमण त्याचबरोबर नालेसफाई व पावसाळ्यामध्ये नाल्यांचे पाणी नागरिकांच्या थेट घरात घुसत आहे. यामुळे होत असलेल्‍या नुकसानी संदर्भात समाजवादी पक्षाचे पदाधिकारी आक्रमक होत धुळे महानगरपालिका आयुक्त अजिज शेख यांच्या कार्यालयात मोर्चा नेला आहे.

अतिक्रमणामुळे रस्‍त्‍याची रूंदी कमी

धुळे शहरातील मुख्य डीपी रोड हा रुंद असला तरी त्यावरती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आल्यामुळे या रस्त्याची रुंदी कमी झाल्याने वाहतुकीची कोंडी वाढू लागली आहे. तसेच धुळे शहरातील सर्वच नाल्यांच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्यानंतर नाल्याची रुंदी आपोआपच कमी झाली असून त्यामुळे पावसाळ्यामध्ये या नाल्यांमध्ये येणाऱ्या पुराचे पाणी परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाला निदर्शनास या बाबी आणून देण्यासाठी समाजवादी पार्टीतर्फे थेट धुळे महानगरपालिका आयुक्त अजिज शेख यांच्या कार्यालयावर आज समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मोर्चा नेला आहे.

Dhule Corporation
लसीकरणानंतर वृद्धाला आले चक्कर; केंद्रावरच उपचाराविना सव्‍वा तास अखेर त्‍यांचा मृत्‍यू

नाल्‍याची खोलीही झाली कमी

पालिका प्रशासनातर्फे नाल्यांची वेळोवेळी सफाई केली जात नसल्याने नाल्यांची खोली घटल्याने पावसाळ्यामध्ये परिसरातील नागरिकांना पुराच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नाल्या जवळील नागरिकांचे शासनाच्या योजने अंतर्गत पुनर्वसन करण्याची मागणी यावेळी समाजवादी पार्टीतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले असून महानगरपालिका प्रवेशद्वारावर समाजवादी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करीत आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com