अन्‌ महिला परीक्षार्थीच्‍या गेटवरून उड्या..

अन्‌ महिला परीक्षार्थीच्‍या गेटवरून उड्या..
अन्‌ महिला परीक्षार्थीच्‍या गेटवरून उड्या..
TET Exam

धुळे : एसटी बससेवा बंद असल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांमधून प्रवास करावा लागत आहे. यातच आज टीईटी परीक्षा होती. बस नसल्‍यामुळे परीक्षेला येणाऱ्या परीक्षार्थींना उशीर झाला. यामुळे परीक्षा केंद्राबाहेर परीक्षार्थींचा गोंधळ उडाला. (dhule-news-Fly-through-the-gate-of-the-TET-examinee's-center)

TET Exam
नवीन चालकांच्‍या हाती स्‍टेअरींग..गोंधळानंतर जळगावातून धुळ्यासाठी पहिली बस रवाना

सर्वत्र एसटी बस बंद असल्यामुळे टीईटी परीक्षांसाठी परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना पोहोचताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. धुळ्यात देखील टीईटी परीक्षेसाठी परीक्षार्थींना पोहोचताना उशीर झाल्यामुळे परीक्षा केंद्राचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. त्यामुळे परीक्षा केंद्राच्या बाहेर परीक्षार्थींच्या आक्रोश बघावयास मिळाला.

प्रवेशद्वारावरून उड्या

परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वाराबाहेर मोठ्या संख्येने परीक्षार्थी उपस्थित होते. परंतु प्रवेशद्वार बंद झाल्यामुळे प्रवेशद्वाराबाहेर या सर्व परीक्षार्थींनी एकच गोंधळ केला. काही परीक्षार्थींनी तर प्रवेशद्वारा वरून उड्या घेत परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश केला. परंतु परीक्षा केंद्र चालकांनी प्रवेशद्वार खोलण्यास नकार दिला.

खासदार भामरेंची केंद्रावर भेट

अखेर आपली कैफियत परीक्षार्थींनी माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार सुभाष भामरे यांच्याकडे मांडली. खासदार सुभाष भामरे यांनी तात्काळ परीक्षा केंद्रावर पोहोचून केंद्र चालकांची समजूत काढली. त्यानंतर परीक्षार्थींना परीक्षेस बसण्यासाठी केंद्र चालकांनी परवानगी दिली. परंतु बस सेवा बंद असल्यामुळे टीईटी परीक्षेसाठी दूरवरून येणाऱ्या परीक्षार्थींना जास्तीच भाडं देऊन नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com