Shirpur News: गावठी बनावटीच्‍या पिस्तोल कार्तुसांसह चौघे ताब्‍यात

गावठी बनावटीच्‍या पिस्तोल कार्तुसांसह चौघे ताब्‍यात
shirpur Police
shirpur PoliceSaam tv

धुळे : शिरपूर तालुक्यातील रोहिणी भोयटी या ठिकाणी काही ईसम हे आपल्या सोबत गावठी पिस्तोल बाळगून असल्याची माहिती (Shirpur) शिरपूर तालुका पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी (Police) सापळा रचत चार जणांना पिस्‍तोल व कार्तुसासह ताब्‍यात घेतले आहे. (Dhule Crime News)

shirpur Police
Nandurbar: चिन्ह गोठवले गेले, चिंता करण्याची गरज नाही; माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी

शिरपूर तालुका पोलिसांना (Shirpur Police) मिळालेल्‍या माहितीच्‍या अनुषंगाने पथक तयार करून सापळा रचला. या दरम्‍यान एका कारमध्ये चार जण संशयास्पद आढळून आले. त्यांची तपासणी केली असता या चौघांकडे दोन गावठी बनावटीचे पिस्तोल पोलिसांना आढळून आले. त्याचबरोबर चार जिवंत कर्तृस देखील त्यांच्यासोबत आढळून आले आहेत.

पोलिसांकडून तपास सुरू

चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे असलेले दोन गावठी बनावटीचे पिस्तोल देखील कारतुसांसह पोलिसांनी जप्त केले. या चौघांनी कुठल्या घातपाताच्या उद्देशाने आपल्यासोबत ही गावठी बनावटीचे पिस्तोल बाळगले होते का यासंदर्भात पुढील तपास शिरपूर तालुका पोलीस करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com