इंग्रजांच्या नाकेनऊ आणणारे स्वातंत्र्य सेनानी; या घटनेला झाली ९९ वर्ष पूर्ण

इंग्रजांच्या नाकेनऊ आणणारे स्वातंत्र्य सेनानी; या घटनेला झाली ९९ वर्ष पूर्ण
इंग्रजांच्या नाकेनऊ आणणारे स्वातंत्र्य सेनानी; या घटनेला झाली ९९ वर्ष पूर्ण

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यातील मुस्लिम बांधवांसाठी व सर्व देशवासीयांसाठी अभिमान व गर्व वाटावा अशी घटना ८ जुलै १९२२ मध्ये घडली होती. सुलेमान शाह रोजन शाह या मुस्लिम धर्मिय स्वातंत्र सेनानींनी १९२२ साली इंग्रजांच्या आज चांगलेच नाकीनऊ आणले होते. (dhule-news-Freedom-fighters-who-brought-the-British-to-the-brink)

इंग्रजांच्या नाकेनऊ आणणारे स्वातंत्र्य सेनानी; या घटनेला झाली ९९ वर्ष पूर्ण
खडसेंमागे ‘भोसरी’चे शुक्लकाष्ठ; मंत्रिपदाचा राजीनामा..पक्षत्याग अन्‌ ‘ईडी’

१९२२ साली थोर सेनानी सुलेमान शाह यांनी मालेगाव येथे इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करीत इंग्रज सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. त्या पार्श्‍वभूमीवर इंग्रजांनी सुलेमान शहा यांना पकडून येरवडा जेलमध्ये टाकले. व ८ जुलै १९२२ रोजी त्यांना येरवडा जेलमध्ये फाशी देण्यात आली होती.

घटनेला झाली ९९ वर्ष पूर्ण

या घटनेला आज ९९ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने धुळ्यात स्वातंत्र्य सेनानी व शहीद सुलेमान शाह रोजन शाह यांच्या आठवणी ताज्या करत त्यांना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी त्यांच्या नातू आझाद अनवर यांच्या उपस्थितीमध्ये नगरसेवक वसीम बारी यासह अनेक उपस्थित मान्यवरांनी सुलेमान शाह यांना श्रद्धांजली दिली आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com