खुनी गणपतीची टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी; हिंदू- मुस्लीम ऐक्याचे प्रतीक

खुनी गणपतीची टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी; हिंदू- मुस्लीम ऐक्याचे प्रतीक
खुनी गणपतीची टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी; हिंदू- मुस्लीम ऐक्याचे प्रतीक

धुळे : हिंदू- मुस्लीम ऐक्याचे प्रतीक व शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या खुनी गणपतीची टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी सोहळा पार पडला. यावेळी ठराविक भक्तांची उपस्थिती होती. (Dhule-news-gamesh-festival-khuni-ganesh-palkhi)

धुळे शहरातील शंभर वर्षांपेक्षा जास्तीची परंपरा असलेला मानाचा खुणी गणपतीची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने टाळ मृदुंग वाजवत ठराविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये पालखी मिरवणूक पार पडली आहे.

इंग्रज काळापासून मानाचे स्थान

हिंदू- मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला हा खुनी गणपती धुळेकरांसाठी मानाचा गणपती समजला जातो. खुनी गणपतीला इंग्रज काळापासून मानाचे स्थान देण्यात आले आहे.

ऐक्याचे प्रतीक

इंग्रज काळामध्ये हिंदू आणि मुस्लिमांमध्ये झालेल्या वादात रक्ताचा पाट वाहिल्यानंतर हिंदू- मुस्लिम बांधवांनी एकत्र येत हा गणपती उत्सव साजरा करण्याचा निर्णय केला. या गणपतीकडे हिंदू बांधव व मुस्लीम बांधव एक्याचं प्रतीक मानतात.

मुस्लिम बांधव करतात पुष्पवृष्टी

खुनी गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी खुनी मस्जिदिवरून गणपतीच्या पालखीवर मुस्लिम बांधव पुष्पवृष्टी करून मस्जिदमधील मोल्वी हे स्वतःच्या हाताने खुणी गणपतीची आरती करतात त्यानंतरच मस्जिदी समोरून या खुनी गणपतीची मिरवणूक पुढे वाटचाल करते.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मिरवणुकी दरम्यान कुठल्याही प्रकारचा डीजे किंवा कर्णकर्कश्श आवाज करणारे वाद्य वाजवले जात नाही. तर पारंपारिक वाद्य म्हणजेच टाळ व मृदुंग या वाद्यांचा वापर या मिरवणुकीदरम्यान केला जातो. परंतु यंदा कोरोणाच्या पार्श्वभूमीवर ही मिरवणूक काढण्यात आली नसून ठराविक भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा पालखी सोहळा पार पडला आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com