बाप्पाच्या स्वागतासाठी धुळेकर सज्ज; बाजारात गर्दी

बाप्पाच्या स्वागतासाठी धुळेकर सज्ज; बाजारात गर्दी
बाप्पाच्या स्वागतासाठी धुळेकर सज्ज; बाजारात गर्दी

धुळे : बाप्पाच्या आगमनासाठी धुळ्याच्या बाजारात मोठ्या प्रमाणात भक्तांची लगबग सुरु आहे. सकाळपसुनच भाविकांची गर्दी पाहण्यास मिळत आहे. (Dhule-news-ganesh-festival-celebretion-market-crowd)

अखेर आज भाविकांची आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्याची प्रतीक्षा संपली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाताना भाविकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद बघावयास मिळत आहे.

परंतु बाप्पाच्या आगमनाच्या लगबगीमध्ये नागरिकांना कोरोनाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. बहुतांश भक्तांच्या तोंडाला मास्क लावले नसल्याचेच बघावयास मिळत आहे.

घरोघरी तयारी

बाप्पाच्या स्वागतासाठी घरोघरी दोन दिवसांपासून तयारी सुरू आहे. कोरोनाची भीती झुगारून बाजारात सजावटीचे साहित्य घेण्यासाठी नागरिकांची सकाळपासून गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. अनेक दिवसांनंतर बाजारात गर्दी झाली होती. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे भक्तांचा कल वाढला आहे. त्यामुळे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही शाडू मातीच्या मूर्तीना मागणी आहे.

कोरोनाची भिती नाही

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने यंदाही गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे. बाजारात आग्रा रोड, देवपूर, साक्रीरोड, संतोषी माता चौक आदी भागात दोन दिवसांपासून सजावट व पूजा साहित्य घेण्यासाठी भाविकांची गर्दी होते असल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com