धुळ्यातील तृतीयपंथी पार्वताबाईंच्‍या घरी विराजले बाप्पा

धुळ्यातील तृतीयपंथी पार्वताबाईंच्‍या घरी विराजले बाप्पा
धुळ्यातील तृतीयपंथी पार्वताबाईंच्‍या घरी विराजले बाप्पा

धुळे : काँग्रेसने नव्याने जाहीर केलेल्‍या कार्यकारणीत सामील केलेल्या तृतीयपंथी पार्वती जोगी यांच्या घरी देखील बाप्‍पा विराजमान झाले. जयघोष करत बाप्‍पाची प्रतिष्‍ठापना केली. (dhule-news-ganesh-festival-celebretion-parvata-jogi-home)

धुळ्यातील तृतीयपंथी असलेल्या पार्वती जोगी यांनी राज्याच्या राजकारणात पदार्पण केल्यानंतर पार्वती जोगी यांच्या घरी पहिल्यांदाच बाप्पा विराजमान झाले आहे. राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाच्या कार्यकारणीमध्ये तृतीय पंथीयांना स्थान देण्यात आले आहे. धुळ्यातील पार्वती जोगी या तृतीयपंथीस राज्याच्या काँग्रेसच्या कार्यकारणीमध्ये सचिव पदासाठी सामाविष्ट करण्यात आले आहे.

धुळ्यातील तृतीयपंथी पार्वताबाईंच्‍या घरी विराजले बाप्पा
बोरी नदीत केमिकल मिश्रीत पाणी; आंघोळीला गेलेल्‍या नागरीकांच्‍या अंगाला लागले अन्‌

पार्वती जोगी यांना स्‍थान मिळाल्‍यानंतर तृतीयपंथीयांमध्ये उत्साहाचे वातावरण बघावयास मिळत आहे. पार्वती जोगी यांनी आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या भक्तीभावाने आपल्या घरी विराजमान केले आहे. पार्वती जोगी यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या इतर तृतीयपंथीयांनी देखील गेल्या दोन दिवसांपासून बाप्पाच्या आगमनासाठी सर्व तयारी केली आहे.

बाप्‍पाजवळ राजकिय वाटचालीत भरभराटीचे साकडे

बाप्पाची स्थापना झाल्यानंतर या सर्व तृतीयपंथियांकडून सर्वांच्या सुखाची मनोकामना करीत तृतीयपंथीयांकडे समाजाचा असलेला दृष्टिकोन बदलु दे, त्याचबरोबर राजकारणात मिळालेल्या संधीचे सोन होऊ दे आणि आगामी काळात राजकीय वाटचालीमध्ये भरभराटी मिळू दे असे साकडे या तृतीयपंथीयांनी आपल्या लाडक्या बाप्पाकडे घातले आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com