बाप्पाच्या मूर्तींनाही इंधनाची झळ

बाप्पाच्या मूर्तींनाही इंधनाची झळ
बाप्पाच्या मूर्तींनाही इंधनाची झळ
Ganesh Festival

धुळे : श्री गणेशोत्सवामुळे आबालवृद्धांचे लाडके दैवत श्री गणरायाचे दोन दिवसांनी आगमन होत आहे. इंधन दरवाढीने मूर्तीसाठी लागणारा कच्चा माल, रंग आणण्याचा वाहतूक खर्च वाढला. कोरोनामुळे कच्चा माल कमी प्रमाणात उपलब्ध झाला. त्यामुळे घरगुती आणि सर्वच गणेशमूर्तींच्या किमतीत यंदा पंधरा टक्के वाढ झाली आहे. (dhule-news-ganesh-festival-ganesh-idols-also-get-fuel)

शहरातील बाजारपेठेत घरगुतीपासून सार्वजनिक मंडळांसाठीच्या आकर्षक श्री गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. उत्सव काळात गणेशमूर्तींबरोबर पूजा सामग्रीसह इतर वस्तूंना मागणी अधिक आहे. त्यामुळे कोरोनामध्ये झालेले नुकसान भरून निघेल, अशी अपेक्षा विक्रेत्यांना आहे. तथापि, कच्चा माल तसेच रंगांच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम गणेशमूर्तींच्या किमतीवरही झाला आहे. सार्वजनिक गणेश मंडळे काटेकोरपणे नियमात राहून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतील. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही उत्साह पाहायला मिळणार नाही. मंडळाच्या गणेशाचे स्वरूपही साधे असेल. मंडळ मोठ्या मूर्ती बाहेरील जिल्ह्यांमधून आणतात. मात्र, गतवर्षीप्रमाणे मोठ्या मूर्तींना यंदाही परवानगी नाही. त्यामुळे गणेश मंडळ स्थानिक मूर्तिकारांकडून मूर्ती घेण्यासाठी प्राधान्य देत आहेत.

व्यवसायात यंदा तेजी

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा घरगुती गणपती मूर्तींना मागणी जास्त आहे. घरगुतीसह सार्वजनिक मित्र मंडळाच्या मूर्तींना मागणी वाढल्याने व्यवसायात यंदा तेजी आहे. त्यात लहान मूर्तींची किंमत शंभर रुपयांपासून दीड हजारापर्यंत आहे. चार फुटांच्या मूर्तीची किंमत पाच ते पंधरा हजारांपर्यंत आहे. त्यामुळे यंदा उलाढालीतही वाढ होणे अपेक्षित आहे.

Ganesh Festival
भरस्‍त्‍यात खुन..तासाभरातच लावला छळा

कोकणात मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शाडू मातीच्या मूर्तींच्या किमती वाढल्या आहेत. तरीही या मूर्तींना वाढती मागणी आहे. बाजारात नगर, पेण, अमरावती आदी ठिकाणांहून पीओपीच्या श्रीगणेश मूर्ती दाखल झाल्या आहेत. डिझेल, कलर, पीओपी महागल्याने पंधरा टक्क्यांनी किमतीत वाढ झाली आहे.

- चेतन बारी, गणेशमूर्ती विक्रेते, धुळे

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com