यात्रोत्सवात अल्‍पवयीन चोरट्यांनी लांबविल्‍या सोनसाखळ्या

यात्रोत्सवात अल्‍पवयीन चोरट्यांनी लांबविल्‍या सोनसाखळ्या
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : धुळे तालुक्यातील कापडणे गावातील ग्रामदेवता भवानी मातेचा यात्रा उत्सव सुरू आहे. या यात्रोत्सवाला सोनसाखळी चोरांचे ग्रहण लागले आहे. यात्रेत येणाऱ्या सासरवाशिन महिलांमध्ये घबराट निर्माण (Dhule News) झाली आहे. (dhule news Gold chains snatching by boy during the pilgrimage)

Dhule News
रोहयो मजुरांवर रानडुकराचा हल्ला; तीन मजूर जखमी

कापडणे यात्राउत्सव सुरू असून आतापर्यंत जवळपास 10 ते 11 महिलांच्या गळ्यातील सोनपोत अल्पवयीन सराईत चोरट्यांतर्फे लंपास (Chain Snatching) करण्यात आली असल्याची माहिती उघडकीस आली आहे. या चोरट्यांनी जवळपास पाच तोळे सोने व दोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. यापैकी जवळपास पाच महिलांनी सोनगीर पोलिस (Police) ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली आहे.

तिघे अल्पवयीन मुले पोलिसांच्‍या स्‍वाधीन

गर्दीमध्ये सोनपोत चोरी करणाऱ्या तिघा अल्पवयीन मुलांना यात्रेतील जमावाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. आता या पकडलेल्या तीनही अल्पवयीन मुलांची पोलिसांतर्फे कसून चौकशी सुरू असून त्यांच्यामार्फत त्यांच्या टोळीचा उलगडा होण्याची शक्यता पोलिस प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com