Gram Panchayat Election: अर्ज भरण्याची वेबसाईट हँग; उमेदवारांचा तासंतास खोळंबा

अर्ज भरण्याची वेबसाईट हँग; उमेदवारांचा तासंतास खोळंबा
Gram Panchayat Election
Gram Panchayat ElectionSaam Tv

धुळे : ग्रामपंचायत निवडणुक जाहीर झाल्‍याने इच्‍छुक उमेदवारांची लगबग सुरू आहे. यात अर्ज भरावयाची प्रक्रीया सुरू असून यासाठी (Dhule News) उमेदवारी अर्ज भरत आहेत. परंतु, वेबसाईट हँग होत असल्यामुळे उमेदवारांचा तासंतास खोळंबा होत आहे. (Live Marathi News)

Gram Panchayat Election
Cyber Crime: मेडीकल कोर्सला प्रवेश देण्याची बतावणी; 15 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक

ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणुकांचे उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना वेबसाईट जाम असल्यामुळे तासंतास खोळंबावे लागत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यापूर्वी उमेदवारी अर्ज (Election News) भरण्याची लगबग उमेदवारांची सुरू आहे. यातच अर्ज भरण्यासाठी असलेली वेबसाईट जाम असल्यामुळे उमेदवारांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.

मुदतवाढीची मागणी

धुळ्यात 128 ग्रामपंचायतींसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. वेबसाईट जाम असल्यामुळे उमेदवारांना होत असलेल्या त्रासाबद्दल उमेदवारांतर्फे नाराजी व्यक्त करण्यात येत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी; अशी मागणी देखील अखेर उमेदवारा तर्फे करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com