Dhule: नवा रस्‍ता त्‍यात डांबरच सापडेना; हाताने खोदला जातोय रस्‍ता

नवा रस्‍ता त्‍यात डांबरच सापडेना; हाताने खोदला जातोय रस्‍ता
dhule news
dhule newssaam tv

धुळे : साक्री तालुक्यातील ग्रामीण भागात धामणदर ते विरखेल रस्त्याचे काम निकृष्ट झाले आहे. या निकृष्‍ट कामाबाबत ग्रामस्‍थ आक्रमक झाले असून हाताने रस्ता पोकरून डांबर शोधण्याची वेळ ग्रामस्थांवर आहे. (dhule news gram sadak yojana road Asphalt was not found in the new road)

dhule news
Nashik Helmet Drive: विना हेल्मेट दुचाकीचालकांना पोलिसांचा दणका, एका दिवसात जवळपास अडीच लाखांचा दंड वसूल

साक्री (Sakri) तालुक्यातील ग्रामीण भागात धामणदर ते विरखेल याठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत (Mukhyamantri Gram Sadak Yojana) रस्त्याचे काम करण्यात आले. परंतु या ठिकाणी डांबरी रस्त्याच्या कामात डांबर शोधावा लागत असल्यामुळे या रस्त्याच्या कामात अतिशय निकृष्टता दिसून आल्याने परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

हाताने उखडतोय रस्‍ता

ग्रामस्थांनी हा रस्ता तयार झाल्यानंतर या रस्त्यावरील डांबर शोधण्यासाठी रस्ता हाताने उकरून काढला आहे. तरीदेखील या ग्रामस्थांना या रस्त्याच्या कामात कुठेही डांबर आढळून आले नाही. ज्या ठिकाणी आढळून आले ते फक्त नाममात्र वापरल्याचे दिसून आले. ज्या कंत्राटदाराला हे काम देण्यात आले आहे, त्या कंत्राटदाराकडून हे काम काढून घेण्यात यावे व रस्त्याचा दर्जा सुधारून धामणदर ते विरखेल या परिसरातील ग्रामस्थांना दिलासा मिळावा अशी मागणी या ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com