मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस; घरांवरील पत्रे उडाली

मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस; घरांवरील पत्रे उडाली
मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस; घरांवरील पत्रे उडाली
dhule heavy rain

भूषण अहिरे

धुळे : पावसाने मागील अनेक दिवसांपासून दडी मारली होती. पाऊस लांबल्‍यामुळे शेतकरी आस लावून होते. जूलै महिन्‍यातील दोन आठवड्यानंतर आज मध्‍यरात्रीनंतर पावसाने हजेरी लावली असून, वादळी पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून नुकसान झाले आहे. (dhule-news-Heavy-rain-after-midnight-Letters-flew-over-the-houses)

गेल्या कित्येक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने धुळे तालुक्यातील बहुतांश ठिकाणी मध्यरात्रीनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. जून महिना पूर्ण उलटल्यानंतर देखील व जुलै महिन्याचा तब्बल दोन आठवडे उलटून देखील पावसाने दडी मारली होती. परंतु काल मध्यरात्री जोरदार पावसासह झालेल्या वादळी वाऱ्यासह आगमन झाले.

dhule heavy rain
'हा' चोर चोरतो रुग्णवाहिकेतील सामान ! हेल्थ कॅान्शियस चोराची चर्चा

घरांवरील पत्रे उडाली

आरणी या गावातील काही घरांवरील पत्रे देखील उडून गेल्यामुळे घरांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर काही शेतात जनावरांसाठी असलेला चारा देखील पूर्णतः जमीनदोस्त झाला आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे उभे ठाकलेले संकट टळले असून पेरणी केलेल्या पितांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com