नाल्‍याच्‍या प्रवाहात दोघे मित्र गेले वाहून; एकाचा मृतदेह सापडेना

नाल्‍याच्‍या प्रवाहात दोघे मित्र गेले वाहून; एकाचा मृतदेह सापडेना
नाल्‍याच्‍या प्रवाहात दोघे मित्र गेले वाहून; एकाचा मृतदेह सापडेना

धुळे : धुळे शहर व तालुका परिसरात मध्‍यरात्रीनंतर अचानक जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नाल्‍यांना पाणी आले होते. यात तालुक्‍यातील नाल्यात दोन तरुण वाहून गेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (dhule-news-heavy-rain-and-two-friends-the-stream-of-Nalya-and-death)

रात्री अचानक झालेल्या पावसानंतर धुळे तालुक्‍यातील वरखेडी शिवारात असलेल्या अन्वर नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले. सकाळी शौचासाठी वरखेडी या शिवारात दोन तरुण गेले असता नाल्यात एकाचा पाय सटकून तो नाल्यात पडत होता. आपला सोबती नाल्‍यात पडत असल्याचे बघितल्यानंतर दुसऱ्या तरुणाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान हे दोघेही तरुण नाल्यातील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत.

नाल्‍याच्‍या प्रवाहात दोघे मित्र गेले वाहून; एकाचा मृतदेह सापडेना
घरात पुराचे पाणी; समाजवादी पार्टीचे आयुक्‍त कार्यालयाबाहेर आंदोलन

एकाचा मृतदेह अजूनही सापडेना

नाल्‍यात वाहून गलेल्‍यांपैकी एका तरुणाचा मृतदेह परिसरातील नागरिकांच्या हाती लागला असून दुसरा तरुण मात्र अद्यापही सापडू शकला नाही. यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधून या संदर्भातील घटनेची माहिती देण्यात आली असून अद्यापही या तरुणाचा कुठल्याही प्रकारे थांगपत्ता लागला नाहीये. या घटनेमुळे वरखेडी शिवारात एकच शोककळा पसरली आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com