रुग्णालयात परिचारिकेचा विनयभंग; तिने केला आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न

रुग्णालयात परिचारिकेचा विनयभंग; तिने केला आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न
विनयभंग
विनयभंग

धुळे : खासगी रुग्णालयात परिचारिका असलेल्या अल्पवयीन युवतीचा रुग्णालयात विनयभंगाचा प्रयत्न झाला. त्यानंतर पीडित युवतीने गळफासातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेत परिचारिका बचावली आहे. या प्रकरणी संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

विनयभंग
ठाकरे सरकार मुस्लिमांचे लांगुलचालन करण्यात मग्न : साेमय्या

शहरातील गरीब नवाज नगरातील १७ वर्षीय पीडित युवतीने चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ती शंभर फुटी रोड परिसरातील एका रुग्णालयात परिचारिका आहे. देवपूरमधील अंदरवाली मशिदजवळील अजमल अन्सारी हा शनिवारी (ता.२७) रात्री साडेआठला संबंधित रुग्णालयात गेला. परिचारिका एकटी असल्याचा गैरफायदा घेत त्याने तिच्याशी अंगलटीचा प्रयत्न केला. तिचा विनयभंग केला.

म्‍हणून तिने घेतला टोकाचा निर्णय

विनयभंग केल्‍यानंतर त्याने तिला फोन करून तिच्यासह कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या युवतीने समाजात बदनामी होईल या भितीपोटी टोकाचा निर्णय घेतला. तिने गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ते लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com