हंगामी वसतीगृह सुरू होईना; ऊसतोड कामगारांच्या मुलांची परवड

हगांमी वसतीगृह सुरू होईना; ऊसतोड कामगारांच्या मुलांची परवड
हंगामी वसतीगृह सुरू होईना; ऊसतोड कामगारांच्या मुलांची परवड
sugarcane worker

धुळे : साखर कारखान्यांचा (Sugar Factory) यंदाचा गळीत हंगाम काही दिवसापुर्वीच सुरु झाला आहे. शिरपूर तालुक्यात तऱ्हाडी वरूळ परिसरात तसेच राज्यातुन अनेक ऊसतोड कामगार पर जिल्‍ह्यात ऊसतोडणीसाठी जाऊन महिना लोटला आहे. तरी ही अद्याप ऊसतोड कामगाराच्या (Sugarcane Worker) पाल्यासाठी राबवल्या जाणाऱ्या हगांमी वसतीगृहे सुरु न झाल्याने ऊसतोड कामगारांच्या पाल्याची परवड होत आहे. त्यामुळे या चिमुकल्यांना आपल्यासोबतच ऊसतोड कामाच्या ठिकाणी घेऊन जाणे शिवाय या कामगारांसमोर पर्याय उरला नाही.

sugarcane worker
प्रवासी वाहतुकीवरून मारहाण; खासगी बस वाहकाचा मृत्यू

सहा महिन्‍यांपासून परजिल्‍ह्यात

लेकराबाळाच्या भविष्यासाठी त्यांच्या उपजिवेकेसाठी तसेच संसाराचा गाढा चालवण्यासाठी ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळख आसलेल्या धुळे जिल्‍ह्यातुन लाखोच्या संख्‍येने ऊसतोड कामगारांचे स्थलांतर परजिल्‍ह्यात महिन्यापुर्वीच झाले आहे. शासन मुलाबाळांसाठी हगांमी वसतीगृह सुरु करेल त्यांच्या पोटापाण्याची व शिक्षणाची सोय लागेल या भरवशावर त-हाडी वरूळ परिसरातील जवळपास ३०० पेक्षा अधिक पाल्याचे कुटुंब सहा महिने ऊसतोडनीसाठी परजिल्‍ह्यात गेले आहे. ऊसतोडनी कामगारांच्या पाठीमागे मात्र या पाल्याची हंगामी वसतीगृहाविना परडवड होत आहे. जिल्‍ह्यात सर्वत्र हिच परस्थीती दिसत आहे. कामगार जाऊन महिना लोटला तरीही हंगामी वसतीगृह सुरु न झाल्याने या पाल्यांना सोयीसुविधा मिळत नाहीत. त्वरीत हंगामी वसतीगृहे सुरु करुन या मुलांना सोयीसुविधा देण्याची मागणी ऊसतोड कामगारांतर्फे होत आहे.

दहा वर्षापासून मागणी प्रलंबित

गेल्या दहा वर्षांपूर्वीपासून ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू करण्यात यावे, ही मागणी शासकीय प्रशासनाकडे व साखर कारखाना प्रशासनाकडे देखील करीत आहे. मात्र याकडे दोघेही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ऊसतोड कामगार मुकादमांनी लावला आहे. तर गोपीनाथ मुंडे यांनी कामगारांसाठी जी योजना सुरू केली होती; ती फक्त कागदोपत्रीच राहिली असल्याचे देखील आरोप कामगार मुकादमांनी प्रशासनावर लावला आहे. त्याचबरोबर प्रशासनाने लवकरात लवकर या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर मंत्रालयात जाऊन आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी मुकादमांकडून देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com