सीसीटीव्ही कॅमेरापासून लपण्यासाठी चोरट्यांची नामी शक्कल

सीसीटीव्ही कॅमेरापासून लपण्यासाठी चोरट्यांची नामी शक्कल
सीसीटीव्ही कॅमेरापासून लपण्यासाठी चोरट्यांची नामी शक्कल
CCTVSaam tv

धुळे : चोरट्यांनी दारू दुकानात चोरी करत असताना सीसीटीव्ही कॅमेरापासून आपला बचाव करण्यासाठी चक्क दारूचे रिकामे बॉक्स डोक्यात घालून दारू दुकानातून चोरी करून (Dhule News) पोबारा केला आहे. (Dhule news idia of the thief to hide from the CCTV camera)

CCTV
महादेवाच्‍या मंदिरातील घंटा व तांब्‍याच्‍या कलशाची चोरी

साक्री (Sakri) तालुक्यातील पिंपळनेर या ठिकाणी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या अनुषंगाने पिंपळनेर पोलिसांनी (Police) या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पथक देखील तैनात केले. अशातच पिंपळनेर येथील दारू दुकानात चोरी झाली असल्याची घटना उघडकीस आली. या चोरीचा (Theft) छडा लावत असताना पोलिसांना तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज हाती लागले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे चक्क दारूचे रिकामे बॉक्स डोक्यात घालून चोरी करताना दिसून आले आहेत.

चार अल्पवयीन चोरटे ताब्‍यात

पोलिसांनी आपल्या विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून तपास सुरू केला असता चार अल्पवयीन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पिंपळनेर पोलिसांना यश आले आहे. पिंपळनेर पोलिस आता या चौघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करीत आहेत. या अल्पवयीन चोरट्यांनी आतापर्यंत कुठे कुठे आणि कशा पद्धतीने चोऱ्या केल्यात त्याचा उलगडा लवकरच होईल; अशी शक्यता पिंपळनेर पोलिसांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com