अवैधरीत्या ठेवलेले अग्निशस्त्र, तीन जिवंत काडतुसे हस्तगत

अवैधरीत्या ठेवलेले अग्निशस्त्र, तीन जिवंत काडतुसे हस्तगत
अवैधरीत्या ठेवलेले अग्निशस्त्र, तीन जिवंत काडतुसे हस्तगत
Dhule NewsSaam tv

धुळे : शिरपूर तालुक्यातील हिसाळे परिसरामध्ये असलेल्या गोरक्षनाथ पाडा या ठिकाणी असलेला व्यक्ती अग्निशस्त्र अवैधरीत्या जवळ बाळगून होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने काडतूस (Dhule News) ताब्‍यात घेतले. (dhule news Illegally placed firearms three live cartridges seized)

Dhule News
वाळूची चोरटी वाहतूक; ट्रॅक्टरसह चार लाखाचा मुद्देमाल जप्‍त

हिसाळे परिसरात असलेल्‍या गोरक्षनाथ पाडा येथील व्‍यक्‍ती अग्निशस्त्र अवैधरीत्या जवळ बाळगून असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ (Police) अधिकारी हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदार मार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले.

संबंधीत व्‍यक्‍ती फरार

पोलिस येत असल्‍याची माहिती समजल्यामुळे संबंधित अग्निशस्त्र बाळगणारा व्यक्ती पसार झाला आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी घराची तपासणी केली असता त्यामध्ये एक अग्निशस्त्र तसेच तीन जिवंत काडतुसे पोलिसांना आढळून आले आहेत. यासंदर्भात फरार झालेल्या संशयिताचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे तपास सुरू आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.