Dhule: विनामास्‍क दंडाची रक्‍कम वाढली; मग दंडापेक्षा मास्क फायद्याचा

विनामास्‍क दंडाची रक्‍कम वाढली; मग दंडापेक्षा मास्क फायद्याचा
Dhule
Dhulesaam tv

धुळे : कोरोना संसर्गाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असल्याने इतर विविध उपाययोजनांबरोबरच शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सोमवारपासून सुरू झाली. विनामास्कचा दंड २०० वरून ५०० रुपये झाला. मात्र, ते वसूल करताना कारवाई पथकाची कसरत होत आहे. त्यामुळे वाढीव दंडाची रक्कम विनामास्क (No Mask) फिरणाऱ्यांना लगाम घालेल की कारवाई थंडावेल, असा प्रश्‍न आहे. (dhule news Increased amount of unpaid fines Then the mask is more beneficiat than the penalty)

Dhule
Corona Update: चाचण्या घटल्याने रुग्णसंख्या कमी; जळगाव जिल्ह्यात नवे ८० बाधित

कोरोना संसर्ग (Coronavirus) रोखण्यासाठी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलला. कोरोनाचे (Corona) संकट सुरू झाल्यापासून ही कारवाई महापालिका, पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आली. दंडात्मक कारवाईत नागरिकांना रीतसर पावती दिली जाते. सुरवातीला दंडाची रक्कम १००, २०० रुपये होती. त्यामुळे नागरिकांकडून ही रक्कम वसूल करताना कारवाई पथकांना अडचण आली नाही. परिणामी, मोठ्या प्रमाणावर कारवाई झाली.

आता पाचशे रूपये दंड वसुल

आता नव्याने कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने बाजारातील गर्दी रोखण्यासाठी प्रशासनाने विविध निर्बंध घातले आहेत. शिवाय विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा आदेशही दिला आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या पथकाने सोमवारी शहरातील महापालिकेच्या (Dhule Corporation) जुन्या इमारतीसमोर कारवाई केली. पथकाने पाच- सहा विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल केला. प्रसाद जाधव, राजेंद्र कदम, जाकिर बेग, भूषण जगदाळे, दीपक पगारे, संजय पवार यांनी ही कारवाई केली. दरम्यान, मंगळवार (ता. ११)पासून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी विविध भागांत पाच-सहा पथके तैनात असणार आहेत.

..तर मास्कच बरा

विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून ५०० रुपये दंड वसूल करताना कारवाई पथकाला मोठी कसरत करावी लागणार, असे दिसते. कारण यापूर्वी १००, २०० रुपये दंड नागरिकांकडून वसूल केले जात होते. आता दंडाचे ५०० रुपये नागरिक खिशातून सहज काढतील, असे दिसत नाही. शिवाय सर्वसामान्य नागरिकाच्या खिशात पाचशे रुपये असतीलच असे नाही आणि असतील तरी थेट पाचशे रुपये काढून देण्याची त्याची तयारी नसेल, हेही तेवढेच खरे. त्यामुळे दंडाच्या या रकमेमुळे एकतर विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या कमी होईल. मात्र, मोठ्या दंडामुळे कारवाई थंडावेल अथवा प्रत्येकवेळी वाद होतील ही शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे कठोर दंडात्मक कारवाई टाळायची असेल, तर विनामास्क न फिरणेच फायद्याचे असणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com