ज्वारी खरेदीत घोटाळा; दोषींची चौकशी करण्याबाबत शिवसेना आक्रमक

ज्वारी खरेदीत घोटाळा; दोषींची चौकशी करण्याबाबत शिवसेना आक्रमक
ज्वारी खरेदीत घोटाळा; दोषींची चौकशी करण्याबाबत शिवसेना आक्रमक
Dhule bajar samiti

धुळे : खरेदी– विक्री महासंघातर्फे शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली जात आहे. असा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला आहे. यासंदर्भात खरेदी विक्री संघाच्या संचालक त्याचबरोबर इतर अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. (dhule-news-jowar-kharedi-fraud-Shiv-Sena-is-aggressive-in-investigating-the-culprits)

खरेदी-विक्री महासंघातर्फे नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचा शेतीमाल अक्षरशः बाराशे ते तेराशे रुपये इतक्या दराने घेतला गेला आहे. २ हजार ६२० रुपये इतका हमीभाव असतानादेखील बाराशे ते तेराशे रुपये इतका भाव शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांची घोर फसवणूक खरेदी- विक्री महासंघातर्फे करण्यात आली आहे. असा आरोप शिवसेनेतर्फे लावण्यात आला आहे.

निम्‍मेहून अधिक शेतकऱ्यांच्या नावांमध्ये घोळ

त्याचबरोबर ३८० शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल विकण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. यापैकी दोनशे ते अडीचशे शेतकऱ्यांच्या नावांमध्ये घोळ करीत व्यापाऱ्यांकडून खरेदी- विक्री संघातील संचालकांनी व इतर अधिकाऱ्यांनी माल खरेदी करून यात घोटाळा केला असल्याचा आरोप शिवसेनेतर्फे लावण्यात आला आहे.

Dhule bajar samiti
एक हजार पुरुषांमागे ९१९ महिला मतदार; नावनोंदणीतही मागे

घोषणाबाजी करत निषेध

भ्रष्ट संचालकांवर व इतर अधिकाऱ्यांवर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून या घटनेचा निषेध केला आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com