Dhule: अन्‌ अधिकाऱ्याच्‍या खुर्चीलाच चिकटवले निवेदन

अन्‌ अधिकाऱ्याच्‍या खुर्चीलाच चिकटवले निवेदन
Dhule: अन्‌ अधिकाऱ्याच्‍या खुर्चीलाच चिकटवले निवेदन
DhuleSaam tv

धुळे : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनतर्फे वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन देण्यासाठी गेले होते. यावेळी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबंधित अधिकारी कार्यालयामध्ये न मिळून आल्याने संतप्त कॉन्ट्रॅक्टर कर्मचारी व अधिकाऱ्यांनी (Dhule News) अधिकाऱ्यांच्या खुर्चीला निवेदन चिकटवत या अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध केला आहे. (dhule news later affixed to the pwd officer's chair)

Dhule
साडेतीन हजाराहून अधिक शेतकऱ्यांचे बिल कोरे; तरीही ८०२ कोटींची थकबाकी

कोरोनाच्या (Corona) काळात कुठलीही कामे होत नसल्याने सर्व व्यवहार ठप्प होते. त्यानंतर आता दीर्घकाळानंतर कामांना सुरुवात झाली असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांतर्फे आर्थिक फायद्यासाठी कॉन्ट्रॅक्टरांना वेठीस धरण्याचे काम सुरू होते. आर्थिक फायद्यासाठी कॉन्ट्रॅक्टरांना वेठीस धरणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन संघटना आक्रमक झाली.

अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी

विनाकारण या कॉन्ट्रॅक्टरांना कुठल्या न कुठल्या कारणाने अडवणूक करून त्यांना नाहक त्रास देण्याचे काम सुरू असल्याचा आरोप लावला. या विरोधात धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनतर्फे आक्रमक भूमिका घेत या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन घोषणाबाजी करीत त्यांचा निषेध करण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com