Leopard Attack: बिबट्याचा हैदोस सुरूच, शेतकऱ्याच्या गाईचा मध्यरात्री पाडला फडशा

बिबट्याचा हैदोस सुरूच, शेतकऱ्याच्या गाईचा मध्यरात्री पाडला फडशा
Leopard Attack
Leopard AttackSaam tv

धुळे : साक्री तालुक्यातील बोधगाव परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बिबट्याचा (Leopard) हैदोस बघावयास मिळत आहे. या दरम्‍यान मध्यरात्रीच्या वेळी शेतात बांधलेल्‍या गायीवर हल्‍ला करत बिबट्याने फडशा पाडला आहे. (Live Marathi News)

Leopard Attack
Gulabrao Patil: राऊत दात काढलेला वाघ आहे का; मंत्री गुलाबराव पाटलांची राऊतांवर खोचक टीका

बोधगाव (ता. साक्री) येथील शेतकरी देविदास गजमल भारूड यांच्या शेतात बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या गाईवर अचानकपणे हल्ला करून गाईचा फडशा पाडला आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये जवळपास नऊ ते दहा शेतकऱ्यांच्या पशुधनावर बिबट्याने हल्ला करून त्यांना जीवे ठार केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून रात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण देखील पसरले आहे.

दोन बिबटे निदर्शनास

दोन बिबटे व त्यांची दोन पिल्ले ही परिसरातील नागरिकांच्या वेळोवेळी निदर्शनास आले असून, या संदर्भात वन विभागाला (Forest Department) माहिती दिली आहे. तरी देखील वन विभागातर्फे अद्यापही कुठल्याही प्रकारची उपाययोजना या बिबट्यांना पकडण्यासाठी करण्यात आली नाही. वनविभागाने लवकरात लवकर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com