Leopard: पुन्हा बिबट्याचा मुक्तसंचार; ऊसतोड मजुरांना आढळली बिबट्याची पिल्ले

पुन्हा बिबट्याचा मुक्तसंचार; ऊसतोड मजुरांना आढळली बिबट्याची पिल्ले
Leopard: पुन्हा बिबट्याचा मुक्तसंचार; ऊसतोड मजुरांना आढळली बिबट्याची पिल्ले
Leopardsaam tv

धुळे : साक्री तालुक्यामध्ये पुन्हा एकदा बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे उघडकीस आले आहे. साक्री तालुक्यातील मालपुर शिवारामध्ये उसाच्या शेतामध्ये ऊसतोड कामगारांना दोन बिबट्याची (Leopard) पिल्ले आढळून आले आहेत. (dhule news leopards again Leopard cubs found by sugarcane workers)

Leopard
St Strike: धुळे विभागात ४७ बस सुरू; ६२५ कर्मचारी दाखल

ऊसतोड कामगार (Sugarcane Worker) ऊसतोडनीचे काम करत असताना शेतामध्ये कामगारांना दोन बारीक मांजराच्या पिल्लाप्रमाणे पिल्ले आढळली. प्रथम या कामगारांना ते इतर जनावरांची पिल्ले असल्याचे भासले. परंतु या पिल्लांना जवळ जाऊन बघितले असता ही बिबट्याची पिल्ले असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली.

वन विभागाचे कर्मचारी दाखल

ऊसतोड कामगारांनी स्थानिकांना यासंदर्भात माहिती दिली. यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना बिबट्यांच्या संदर्भात माहिती देण्यात आली. त्यानंतर आता बिबट्या मादी पकडण्यासाठी वन विभागातर्फे (Forest Department) प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com