पोलीस बनवून लुटमार..इराणी टोळीच्या आवळल्या मुसक्या

पोलीस बनवून लुटमार..इराणी टोळीच्या आवळल्या मुसक्या
पोलीस बनवून लुटमार..इराणी टोळीच्या आवळल्या मुसक्या
पोलीस

धुळे : जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी दिवाळी सणाच्या काळामध्ये पोलीस असल्याची बतावणी करून लूट करणाऱ्या इराण टोळीचा धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. टोळीतील तब्बल पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून स्कार्पिओ कारसह दोन दुचाकी व जवळपास ७ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. (dhule-news-Making-police-and-robbery-dhule-police-arrested-five-parson)

पोलीस
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची हजेरी आता फेस रीडिंगद्वारे

धुळे जिल्ह्यातील निजामपुर व दोंडाईचा या ठिकाणी पोलीस असल्याची बतावणी करून इराणी टोळीतील चोरट्यांनी वयोवृद्धांकडून सोन्या चांदीचे दागिने लुटल्याची घटना उघडकीस आली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आपली तपासाची चक्रे फिरवली असता ही चोरी इराणी टोळीतील चोरट्यांनी केल्याची माहिती उघडकीस आली.

चाळीसगाव रोड चौफुलीवर असल्‍याची गुप्‍त माहिती

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळवली असता सोमवारी (ता.१५) या टोळीतील काहीजण धुळे शहरात देखील आले असून ते चाळीसगाव रोड परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली होती. या मिळालेल्या माहितीच्या आधारे चाळीसगाव रोड चौफुलीच्या परिसरात पोलिसांनी दोन दुचाकी वाहन व स्कार्पिओ कारमध्ये बसलेल्या इराणी टोळीतील ५ जनांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून जवळपास ७ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पुढील तपास पोलिस करीत असून या कारवाई संदर्भातील माहिती धुळे पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com