सरपंचाचा भ्रष्‍ट्राचार; ग्रामस्‍थांनी केला रास्‍तारोको

सरपंचाचा भ्रष्‍ट्राचार; ग्रामस्‍थांनी केला रास्‍तारोको
सरपंचाचा भ्रष्‍ट्राचार; ग्रामस्‍थांनी केला रास्‍तारोको
रास्‍तारोको

धुळे : मेथी ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी भ्रष्टाचार केल्‍याचा आरोप ग्रामस्‍थांनी केला. हा भ्रष्‍ट्राचार दडपण्याचा प्रयत्न काही अधिकारी करत आहे. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात ग्रामस्थांनी रास्तारोको केला. (dhule-news-methi-grampanchayat-Sarpanch-corruption-Villagers-did-Road-block)

रास्‍तारोको
विधानपरिषद निवडणुक..धुळ्यातून अमरीश पटेलांच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब

शिंदखेडा तालुक्यातील मेथी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचातर्फे भ्रष्टाचाराचा आरोप लावत या संदर्भात ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे गेल्या काही महिन्यांपूर्वी तक्रार केली होती. या अनुषंगाने पंचायत समिती प्रशासनातर्फे भ्रष्टाचारासंदर्भात चौकशीचे आदेशही देण्यात आले होते. त्यानंतर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून या भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचा आरोप लावत ग्रामस्थांनी संबंधित सरपंचाचा भ्रष्टाचार पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी; या मागणीसाठी रास्तारोको केला आहे.

वाहनांच्‍या लांब रांगा

संतप्त ग्रामस्थांनी बराच वेळ रस्ता रोखून आंदोलन केले. यावेळी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करून या ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर लवकरात लवकर या भ्रष्टाचारासंदर्भात कारवाई करण्यात न आल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील मेथी ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. ग्रामस्थांनी रास्ता रोको केल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे देखील बघायला मिळाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com