शिवसेनेने कुवत ओळखावी, त्‍यांची अवस्‍था गटारातील बेडकासारखी; आमदार महाजन यांची टिका

शिवसेनेने कुवत ओळखावी, त्‍यांची अवस्‍था गटारातील बेडकासारखी; आमदार महाजन यांची टिका
शिवसेनेने कुवत ओळखावी, त्‍यांची अवस्‍था गटारातील बेडकासारखी; आमदार महाजन यांची टिका
Girish MahajanSaam tv

धुळे : शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आज मुंबईतील सभेनंतर भाजपचे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी टिकेची तोफ डागताना सत्तालंपट शिवसेनेची (Shiv Sena) अवस्था गटारातील बेडकासारखी झाली असून त्यांचे हिंदूत्व बेगडी असून ते फक्त डराव...डराव करून जनतेची दिशाभूल करू शकत नाही, अशी भूमिका मांडली. शिवाय आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने चार खासदार तरी निवडून आणून दाखवावे, असे आव्हानही आमदार महाजन (Girish Mahajan) यांनी दिली. (dhule news MLA girish Mahajan criticism Shiv Sena should recognize their strength)

Girish Mahajan
गुरांना वाचविताना झाला घात; कार झाडावर आदळून तीघांचा जागीच मृत्यू

भाजपचे (BJP) महापौर प्रदीप कर्पे यांच्या मुलाच्या विवाहानिमित्त आमदार महाजन येथे रात्री नऊनंतर उपस्थित झाले. त्यावेळी त्यांची मुंबईतील सभेसंबंधी भूमिका जाणली असता त्यांनी शिवसेनेसह मुख्यमंत्री ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टिकेचे आसूड ओढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोनदा पंतप्रधान बनवून देशातील जनतेने त्यांना लोकनेता म्हणून शिक्कामोर्तब केला आहे. अशा वेळी शिवसेनेच्या दाखल्याची भाजपसह पंतप्रधान मोदी यांना गरज नाही. देशात सर्वाधिक बहुमताने मोदींच्या नेतृत्वात भाजपची ऐतिहासिक सत्ता आली आहे. शिवसेनेची कुवत काय हे आधी ओळखावे. या पक्षाची अवस्था गटारातील बेडकासारखी झाली आहे. यापेक्षा समुद्रात काय चाललंय ते त्यांनी पाहावे. देशाची जनता मोदींकडे नेतृत्व म्हणून पाहते. त्यावर शिवसेना काय डराव...डराव करते, अशी खोचक टिका आमदार महाजन यांनी केली.

आता चार खासदार निवडून दाखवा

रशिया व युक्रेनच्या युध्दामुळे जगात महागाई झाली आहे. श्रीलंकेत साडेतीनशे ते चारशे लिटर डिझेल-पेट्रोल झाले आहे. गॅसच्या किमती वाढत आहेत. राज्यातील रस्ते विकास, मेट्रो, समृद्धी महामार्गात शिवसेना, महाविकास आघाडी सरकारचे काय कर्तृत्व आहे. हे विकास प्रकल्प मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीत झाले आहेत. त्यांच्या जीवावर तुम्ही (विरोधक) कॉलर टाईट करत आहात. देशात केवळ भाजपशी युती असल्याने शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने चार खासदार तरी निवडून आणावे, असे आव्हान आमदार महाजन यांनी दिले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.