शेतकऱ्यांना विजेचे प्रश्‍न भेडसावू नये; आमदार कुणाल पाटील यांच्या सूचना

शेतकऱ्यांना विजेचे प्रश्‍न भेडसावू नये; आमदार कुणाल पाटील यांच्या सूचना
शेतकऱ्यांना विजेचे प्रश्‍न भेडसावू नये; आमदार कुणाल पाटील यांच्या सूचना
MLA kunal patil

भूषण अहिरे

धुळे : विज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना वारंवार विजेचे प्रश्‍न भेडसावत असतात. त्यामुळे शेती उत्पन्नाचे प्रचंड नुकसान होत असते. शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्‍न सुटावेत म्हणून विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कामाची गतीशिलता वाढवावी. तसेच विजेचे प्रश्‍न भेडसावू नये; अश सुचना आमदार कुणाल पाटील यांनी महावितरणच्‍या अधिकाऱ्यांना दिल्‍या. (dhule-news-mla-kunal-patil-mahavitaran-meet-and-farmer-light-connection-probem-solve)

धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत आज विज वितरण कंपनीचे अधिकारी आणि जिल्हा नियोजन समितीची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यांनी तालुक्यातील विज पुरवठ्याच्या कामांबाबतचा आढावा जाणून घेतला.

MLA kunal patil
लसीकरणासाठी टोकन पद्धती; गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्‍य

कृषी व गावठाण विजेसाठी निधी

धुळे तालुक्यातील शेतीपंप आणि शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्‍न तातडीने सोडवून विज पुरवठ्याची मंजूर कामे विना विलंब सुरु करण्याच्या सूचना देखील दिल्‍या. कृषी पंप आणि गावठाण विज पुरवठ्याच्या कामांसाठी पाहिजे तेवढा निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com