मुंबई- आग्रा महामार्ग; खड्ड्यात उभे दाखविला मार्ग, समाजवादी पार्टीचे आंदोलन

मुंबई- आग्रा महामार्ग; खड्ड्यात उभे दाखविला मार्ग, समाजवादी पार्टीचे आंदोलन
मुंबई- आग्रा महामार्ग; खड्ड्यात उभे दाखविला मार्ग, समाजवादी पार्टीचे आंदोलन
मुंबई- आग्रा महामार्ग

धुळे : मुंबई आग्रा महामार्गावर धोकादायक खड्डे निर्माण झाले असून सध्या महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. संबंधित प्रशासनाला जाग आणण्यासाठी समाजवादी पार्टीतर्फे खड्यात उभे राहून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. (dhule-news-Mumbai-Agra-Highway-damage-The-path-shown-in-the-pit-movement-of-Samajwadi-Party)

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे गेल्या काही महिन्यांपासून मुंबई- आग्रा महामार्गावर तसेच धुळे शहराजवळ चाळीसगाव चौफुली परिसरात मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागत आहे. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याकडे दुर्लक्ष करीत आहे. या रस्त्याची देखभाल करणाऱ्या संबंधित टोल कंपनी फक्त टोल वसूल करीत आहे. याविरोधात समाजवादी पार्टीतर्फे खड्यात उभे राहून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे.

खड्ड्यात उभे दाखविला मार्ग

समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यात उभे राहून ये– जा करणाऱ्या वाहनांना खड्ड्यापासून सावध करत मार्ग दाखवीत आंदोलन केले आहे. सदर खड्यामुळे मोठी जिवीतहानी झाल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का? असा देखील प्रश्न या आंदोलनकर्त्यांनी आंदोलनादरम्यान उपस्थित केला आहे.

मुंबई- आग्रा महामार्ग
आता तरी तोंडाला पाने पुसू नका; माजी मंत्री गिरीश महाजन यांचा शासनावर निशाणा

तर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात होऊन कोणी जखमी अथवा मयत झाल्यास त्याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासन व संबंधित टोल कंपनीला जबाबदार धरून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील आंदोलकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com