साक्री नगरपंचायत निवडणूक जाहीर; 21 डिसेंबरला होणार मतदान

साक्री नगरपंचायत निवडणूक जाहीर; 21 डिसेंबरला होणार मतदान
साक्री नगरपंचायत निवडणूक जाहीर; 21 डिसेंबरला होणार मतदान
Sakti nagar panchayat

धुळे : धुळ्यात सध्या निवफणुकीचे वारे जोराने वाहू लागले आहेत. नुकतीच जिल्हा बँकेची निवडणूक पार पडल्यानंतर धुळे व नंदुरबार जिल्हा विधान परिषद निवडणूकीसाठी देखील प्रक्रिया सुरू आहे. त्यातच आता साक्री नगरपंचायत निवडणूक देखील जाहीर करण्यात आली आहे. (dhule-news-nagar-panchayat-election-sakri-nagar-pachayat-program)

राज्यातील एप्रिल 2000 ते मे 2021 या कालावधीमध्ये मुदत समाप्त झालेल्या 81 व डिसेंबर 2019 मध्ये मुदत समाप्त होणाऱ्या 18 तसेच नवनिर्मित 6 अशा एकूण 105 नगरपंचायतमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2020-21 जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायतीचा देखील समावेश आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

1 ते 7 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारता येणार असून 8 डिसेंबरला प्राप्त झालेल्या नामनिर्देशन अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडणार आहे. 13 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी; तर 21 डिसेंबर 2021 मतदान प्रक्रिया पार पडेल. 22 डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com