धुळे– नंदुरबार जिल्हा बँक : तीन माजी आमदारांची प्रतिष्‍ठा पणाला

तीन माजी आमदारांची प्रतिष्‍ठा पणाला
धुळे– नंदुरबार जिल्हा बँक : तीन माजी आमदारांची प्रतिष्‍ठा पणाला
dhule nandnrubar bank

धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या नऊ मतदार संघातील 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. आज सतरा पैकी दहा जागांसाठी मतदान होत आहे. 17 पैकी सात जागांवर बिनविरोध निवड झाली असून आता शिल्लक राहिलेल्या दहा जागांसाठी वीस उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. (dhule-news-nandurbar-dhule-bank-election-today-vitting-start)

dhule nandnrubar bank
जळगाव जिल्हा बँक संचालकपदासाठी आज मतदान

निवडणुकीदरम्यान ९८३ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. तर या निवडणुकीमध्ये तीन माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे तसेच माजी आमदार शरद पाटील यांच्यासह नंदुरबार चे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

भाजपचे वर्चस्‍व राहण्याची शक्यता

जिल्हा बँकेचे अध्यक्षपदी असलेले माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये गेल्या पूर्वी प्रवेश केला. तसेच या निवडणुकीमध्ये मोठा चेहरा मानले जाणारे माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांचादेखील भाजपमध्ये प्रवेश झालेला असल्यामुळे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे तसेच माजी मंत्री अमरीशभाई पटेल या दोघा दिग्गज नेत्यांमुळे या निवडणुकीत भाजपच वर्चस्व राहण्याची दाट शक्यता आहे.

बिनविरोधचा प्रयत्‍न पण

सर्वपक्षीय पॅनल तयार करून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे यांनी भाजपच्या या एकतर्फी विजयाला जणू सुरंग लावल्याचे दिसून येत आहे. कारण जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे यांचे चिरंजीव अक्षय पोपटराव सोनवणे यांनी वेगळी चूल मांडल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचे भाजपचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदार कोणाच्या पारड्यात आपला कौल टाकणार हे बघण औचित्याच ठरनार आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com