धनदाईदेवीच्या चरणी सव्वा लाख भाविक नतमस्तक

धनदाईदेवीच्या चरणी सव्वा लाख भाविक नतमस्तक
धनदाईदेवीच्या चरणी सव्वा लाख भाविक नतमस्तक
धनदाईदेवी

म्हसदी (धुळे) : नवरात्रोत्सव म्हणजेच नवचैतन्य. येथील कुलमाता धनदाईदेवीजवळ घटस्थापनेपासून भाविकांची गर्दी होत आहे. कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळत देवीचे दर्शन दिले जात आहे. अष्टमीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. १३) पहाटेपासून भाविकांची गर्दी होत आहे. सुमारे सव्वा लाख भाविक देवीच्या चरणी नतमस्तक झाले. (dhule-news-navratri-utsav-ashtami-dhandai-devi-one-lakh-bhavik-prey)

भाविकांची पावले पहाटेपासूनच देवीच्या मंदिराकडे वळत आहेत. विजयादशमीपर्यंत ही गर्दी कायम राहील. धुळ्यासह नाशिक, जळगाव,नंदुरबार, अहमदनगर, गुजरात, मध्य प्रदेशातील भाविक दर्शन व नवसपूर्तीसाठी येतात.

कोरोना नियमांचे पालन करत दर्शनाचा लाभ

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तरुण ऐक्य मंडळ सतर्क आहे. देवीजवळ प्रत्येक भाविकास सॅनिटाईझ करत दर्शन दिले जात आहे. मंदिराच्या सभागृहात स्टीलचे बॅरिकेड लावून व्यवस्था करण्यात आली आहे. पूरक सुरक्षेच्या दृष्टीने ३२ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. भाविकांना पिण्याच्या पाण्यासह निवासाची व्यवस्था मंडळातर्फे करण्यात आली आहे. कोरोनाकाळात भाविक देवीच्या दर्शनापासून अलिप्त होते. कोरोनाच्या सर्व शासकीय नियमांचे पालन करत भाविकांना दर्शनासाठी सोडले जात आहे. भाविकांनी शिस्तीने दर्शन घेत नवसपूर्ती करावी, असे आवाहन तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष देवरे, उपाध्यक्ष के. एन. देवरे, कोशाध्यक्ष उत्तमराव देवरे, सचिव महेंद्र देवरे व संचालक मंडळाने केले आहे.

धनदाईदेवी
सातपुडा निवासी मनुमाता..अष्‍ठमीला दर्शनासाठी भाविकांची गर्दी

धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

देवीला कुलदैवत मानणारे भाविक देवीजवळ विविध धार्मिक कार्यक्रम करतात. गेल्या दीड वर्षापासून मंदिर बंद होते. घटस्थापनेपासून मंदिर खुले झाल्याने भाविकांनी सरकार आणि मंदिर प्रशासनाचे आभार मानले. गेल्या गुरुवार (ता. ७)पासून भाविकांनी देवीजवळ घटस्थापना केली. देवीजवळ मानाचा ध्वज चढविण्यात आला. चक्रपूजाही केली जात आहे. देवीजवळ नवरात्रोत्सवात आरत्या लावल्या जातात. दररोज पहाटे व सायंकाळी सामूहिक काकड आरती होते. स्थानिक भाविक पहाटेच्या आरतीसाठी गर्दी करतात. धनदाईदेवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवरात्रोत्सव, चैत्र अष्टमी, माघ अष्टमीला भाविकांची मोठी गर्दी असते. वाढती गर्दी लक्षात घेता घेऊन धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळातर्फे नियोजन केले जाते.

घटस्थापनेपासून कोरोना निर्बंधांच्या शासकीय नियमांचे पालन करत मंदिरे खुले केली आहेत. देवीजवळ वाढती गर्दी लक्षात घेत नियोजन केले जात आहे. भाविकही सहकार्य करत आहेत. देवीजवळ शिस्तीने दर्शन दिले जात आहे.

- सुभाष देवरे, अध्यक्ष, धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळ, म्हसदी

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com