पुस्‍तकातील अभ्‍यास भिंतीवर; ध्येयवेड्या शिक्षकांनी भिंती केल्या बोलक्या
Teacher

पुस्‍तकातील अभ्‍यास भिंतीवर; ध्येयवेड्या शिक्षकांनी भिंती केल्या बोलक्या

पुस्‍तकातील अभ्‍यास भिंतीवर; ध्येयवेड्या शिक्षकांनी भिंती केल्या बोलक्या

कापडणे (धुळे) : गेल्या दीड वर्षापासून कोरोना संकटामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. परंतु, प्रयत्‍न तोडके पडत आहेत. काही ना काही समस्‍यांमुळे विद्यार्थी अभ्‍यास करू शकत नाही. मात्र शाळेच्‍या वर्गखोलीच्‍या चार भिंतीतील शिक्षण शिकविता येत नसले तरी पुस्‍तक, अभ्‍यास गावातील भिंतीवर उतरवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्‍यास सोपा केला आहे. (dhule-nikumbhe-village-wall-paint-and-student-study-paints-teacher)

विद्यार्थींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी विविध स्तरांवर उपाययोजना केल्या जात आहेत. यात व्हॉट्सअॅप गृप, पीडीएफ, झूम व गूगल मीट, ओट्यावरची शाळा, गृहभेटी, गोष्टींचा शनिवार, स्वाध्याय सेतू असे विविध प्रयत्न होताना दिसत आहेत. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत पोचणे ही तारेवरची कसरत ठरत आहे. विशेषत; ग्रामीण भागात, सर्वच कष्टकरी पालकांकडे मोबाईल नाही, रिचार्ज करण्यासाठी पैसे नाहीत, रेंज नाही या अडचणी ऑनलाईन शिक्षणात भासत आहेत.

पाठ्यपुस्‍तक भिंतीवर

गोरगरीबांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत. या तळमळीतून निकुंभे येथील उपक्रमशील शिक्षक गोकुळ पाटील आणि लोणखेडे येथील शिक्षक राकेश जाधव या ध्येयवेड्या शिक्षकांनी भिंतींवर पाठ्यपुस्तकातील महत्वाचे पाठ्यमुद्दे लिहिण्यास सुरुवात केली आहे. इंग्रजी व मराठी मुळाक्षरे, समविषम संख्या, संख्या वाचन, चढता उतरता क्रम, भौमितिक आकार, गार्डन ऑफ वर्ड्स आदी भिंतीवर उतरविले आहे.

Teacher
नंदुरबारला नवीन आलेल्या अधिकाऱ्यांचा असाही योगायोग

विद्यार्थीच नाही, तर आबालवृद्ध वाचू लागले

निकुंभे येथील विद्यार्थ्यांसह आबालवृद्धांसह सारेच वाचू लागली आहेत. तक्ते वहिवर उतरवू लागली, पाठ करु लागली आहेत. या उपक्रमाचे ज्ञानेश्वर पाटील, गोरख पाटील, ग्रामपंचायत सदस्य दादाभाई पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी भारती भामरे, केंद्र प्रमुख भगवान धोबी, मुख्याध्यापक अशोक पाटील आदींकडून समाधान व्यक्त होत आहे. या उक्रमास विश्वनाथ सोमवंशी, किशोर माळी, स्मिता सराफ, सोनाली बोरसे, वसंत पानपाटील या शिक्षकांनीही हातभार लावला आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com