ओबीसी आरक्षण देण्याची मानसिकताच नाही; ॲड. राहुल वाघ यांचा राज्य सरकारवर निशाणा

ओबीसी आरक्षण देण्याची मानसिकताच नाही; ॲड. राहुल वाघ यांचा राज्य सरकारवर निशाणा
ओबीसी आरक्षण देण्याची मानसिकताच नाही; ॲड. राहुल वाघ यांचा राज्य सरकारवर निशाणा
OBC ReservationSaam tv

धुळे : ओबीसी आरक्षण देण्याची राज्‍य सरकारची मानसिकताच नाही. आरक्षणासाठी आवश्‍यक असलेल्‍या बाबी सोडून भलत्‍याच गोष्‍टींकडे लक्ष देत असल्‍याचा आरोप ॲड. राहुल वाघ यांनी राज्य सरकारवर केला. (dhule news no OBC reservation mentality Add Rahul Wagh targets state government)

OBC Reservation
गढूळ पाण्याविरोधात भाजपचे रंगबिरंगी आंदोलन

ओबीसी आरक्षणसंदर्भात न्यायालयाने ओबीसी आरक्षणविनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात असे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशानंतर राज्य सरकारची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली व या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वात मोठा अडथळा (BJP) भाजप व ॲड. राहुल वाघ ठरत असल्याचे म्हटले होते. यावर ॲड. राहुल वाघ यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

ओबीसी जनतेची दिशाभूल

ओबीसी आरक्षण देण्याची (Dhule News) मानसिकता नसल्याचा आरोप केला असून ओबीसी आरक्षणासाठी ज्या बाबी महत्त्वाच्या आहेत. त्या सोडून राज्य सरकार भलत्याच गोष्टींच्या मागे लागले असल्याचा आरोप देखील राहुल वाघ यांनी केला. तसेच राज्य सरकार ओबीसी जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप देखील राज्य सरकारवर लावला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.