चाराच नाही तर गावाकडे परतायचे कसे; मेंढपाळांपुढे प्रश्‍न

चाराच नाही तर गावाकडे परतायचे कसे; मेंढपाळांपुढे प्रश्‍न

चाराच नाही तर गावाकडे परतायचे कसे; मेंढपाळांपुढे प्रश्‍न

कापडणे (धुळे) : धुळे जिल्ह्यात पाऊस हुलकावणी देत आहे. सर्वदूर पाऊस नाही. तुरळक ठिकाणी अल्पसा पाऊस होत आहे. साक्री तालुक्यातील मेंढपाळांना गावाकडे परतीचे वेध लागले आहे. पावसाळा सुरु होण्यास महिना उलटला. अद्यापही पावसाअभावी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता झालेली नाही. चारा नाहीतर परतायचे कसे, असा प्रश्न मेंढपाळांमधून उपस्थित होत आहे. (dhule-news-no-rain-and-fodder-but-how-to-return-to-the-village-shepherds)

जिल्ह्यात पावसाचे सातत्य नाही. बऱ्याच ठिकाणी पेरा मोड आलेला आहे. दुबार पेरणीसाठी पाऊस नाही. तर ज्यांनी दुबार पेरणी केली. त्यांचे पिक भूईतून बाहेर डोकावत आहे. पाऊस नसल्याने वाढ खुंटली आहे. पाच आठवडे उलटल्यानंतर पाऊस नाही. हिरव्या चाऱ्याची उपलब्धता झालेली नाही. दुधाळ जनावरांना महागडा चारा खरेदी करावा लागत आहे.

चाराच नाही तर गावाकडे परतायचे कसे; मेंढपाळांपुढे प्रश्‍न
कारमधून ४० किलो गांजासह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

मेंढपाळांची भटकंती

साक्री तालुक्यातील मेंढपाळ चाऱ्यासाठी भटकंती करीत आहेत. त्यांना पावसाळ्यात परतीचे वेध लागले आहे. मात्र तिकडे हवा तसा पाऊस झालेला नाही. चाऱ्याची वाढ झालेली नाही. परीणामी कापडणे, देवभाने, सोनगीर, नगाव, न्याहळोद परीसरातच भटकंती सुरु आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com