परीक्षा उत्तीर्ण होऊनही प्रशासकिय सेवेत नाही; २५४ कर्मचाऱ्यांचा प्रश्‍न

परीक्षा उत्तीर्ण होऊनही प्रशासकिय सेवेत नाही; २५४ कर्मचाऱ्यांचा प्रश्‍न

भरती प्रक्रियेमध्ये उत्तीर्ण झालेल्या २५४ कर्मचाऱ्यांनी अखेर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उत्तीर्ण झालेल्या चालक कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर सेवेमध्ये रुजू करण्याची मागणी केली

धुळे : धुळे जिल्हा परिवहन विभागात २०१९ मध्ये चालक या पदासाठी भरती प्रक्रिया पार पडली होती. या भरती प्रक्रियेदरम्यान उत्तीर्ण झालेल्यांची ट्रेनिंग देखील झाले. परंतु ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर अद्यापही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या या कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करण्यात आले नाही. (dhule-news-Not-in-administrative-service-even-after-passing-the-exam)

उत्तीर्ण झालेल्या या कर्मचाऱ्यांवर अक्षरशः उपासमारीची वेळ येऊन ठेपली असून त्यांच्या कुटुंबीयांना देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच या भरती प्रक्रियेमध्ये उत्तीर्ण झालेल्या २५४ कर्मचाऱ्यांनी अखेर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उत्तीर्ण झालेल्या चालक कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर सेवेमध्ये रुजू करण्याची मागणी केली आहे.

परीक्षा उत्तीर्ण होऊनही प्रशासकिय सेवेत नाही; २५४ कर्मचाऱ्यांचा प्रश्‍न
‘वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू मेहेंगा तेल..’ म्हणत महागाईविरोधात आंदोलन

आत्‍मदहनाचा इशारा

यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नियुक्त न झालेल्या या कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील केली. तसेच पुढील काही दिवसांमध्ये जिल्हा प्रशासनाने व परिवहन विभागाने याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास नियुक्ती रखडलेल्या या कर्मचाऱ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com