एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याच्या नोटीस; हातात फलक घेवून आंदोलन

एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याच्या नोटीस; हातात फलक घेवून आंदोलन
एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याच्या नोटीस; हातात फलक घेवून आंदोलन
ST Employee Strike

धुळे : एसटी कर्मचाऱ्यांना कामावर तात्काळ रुजू होण्याच्या नोटिसा बजावल्यानंतर धुळ्यात संपकरी कर्मचाऱ्यांनी हातात फलक झळकवत विभागीय कार्यालय बाहेर आंदोलन केले. (dhule-news-Notice-to-ST-employees-to-return-to-work-Movement-with-placards-in-hand)

ST Employee Strike
कत्‍तलीसाठी जनावरांची वाहतुक; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्‍यात

एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण व्हावे; या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपाचा फटका एसटी परिवहन महामंडळाला बसत असल्यामुळे परिवहन विभागातर्फे संप मोडीत काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अशातच एसटी महामंडळातर्फे संपकरी कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर हजर होण्यासंदर्भात नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत. परंतु राज्य शासनातर्फे सुरू असलेल्या दडपशाहीला न जुमानता धुळ्यात आजही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे.

ताटात विष कालवू नका..

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आज धुळे विभागीय कार्यालय बाहेर हातामध्ये फलक धरून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले आहे. राज्य शासनातर्फे ज्या पद्धतीने आंदोलकांची ना दडपशाही सुरू आहे. या दडपशाहीला कुठल्याही कर्मचाऱ्याने बळी न पडता संपामध्ये ठामपणे उभे राहावे; यासाठी या संपकरी कर्मचाऱ्यांना विभागीय कार्यालयाच्या बाहेर हातामध्ये हॅलो धरून हातातोंडाशी आलेला घास घालवू नका व आमच्या मुलाबाळांच्या ताटात विष कालवू नका, आम्हाला अभिमानाने जगू द्या, या आशयाचे फलक झळकवत राज्य सरकारचा निषेध केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com