Dhule News: गुंगीकारक औषधाच्या साठ्यासह एक ताब्‍यात

गुंगीकारक औषधाच्या साठ्यासह एक ताब्‍यात
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : धुळे शहरातील आझादनगर पोलिसांना मिळालेल्‍या माहितीनुसार कारवाई केली आहे. यात मानवी (Dhule News) मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गुंगीची औषधी सोबत असलेल्‍या इसमास पोलिसांनी (Police) ताब्‍यात घेतले आहे. त्‍याच्‍याकडून सुमारे ४० बाटल्‍या जप्‍त केल्‍या आहेत. (Latest Marathi News)

Dhule News
Deshi Jugad: बाप असावा तर असा..भंगारातून २० हजारात साकारली ई– बाईक; पूर्ण केलं लेकाचं दुचाकीचे स्वप्न

धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या नटराज टॉकी परिसरामध्ये एक अज्ञात इसम आपल्यासोबत मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गुंगीकारक औषधांचा साठा बाळगून असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्यासह पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचला. या दरम्यान संबंधित इसम काटेरी झुडपामध्ये कोरेक्स या मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या औषधाचा साठा घेऊन असल्याचे पोलिसांना आढळून आले.

Dhule News
Chicken Research: चिकन खात असाल तर सावधान..शास्त्रज्ञांच्या अभ्यासात धक्‍कादायक वास्‍तव समोर

४० बाटल्‍या जप्‍त

पोलिसांनी तात्काळ संबंधिताला ताब्यात घेत त्याची तपासणी केली. त्याच्याकडे कोरेक्स या औषधाच्या जवळपास ४० बाटल्या पोलिसांना आढळून आल्या आहेत. या इसमाविरोधात आझाद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आझाद नगर पोलीस करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com