बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त
बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त
बनावट दारू

धुळे : धुळे शहर परिसरात बनावट दारू तयार केली जात होती. येथून ठिकठिकाणी दारूचा पुरवठा केला जात होता. याबाबत धुळे शहर पोलिसांना माहिती मिळालेली होती. यावरून पोलिसांनी बनावट दारुचा कारखाना उद्ध्वस्त करीत चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. (dhule-news-police-action-duplicate-liquor-factory-demolished)

बनावट दारू
भावजायीला पाटावर बसवत नणंदांनी ओवाळले; माहेरी आल्‍यावर अनोखी भाऊबीज

धुळे शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीदारा मार्फत धुळे शहरातील प्लॉट नंबर १३ सुरतवाला बिल्डिंगमध्ये या घरात छापा टाकून बनावट दारुचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. या कारवाई दरम्यान दोन महिला व दोन पुरुषांना धुळे शहर पोलिसांनी रंगेहात अटक केली असून या घटनेचा मुख्य सूत्रधार घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला आहे. परंतु त्याचा देखील शोध धुळे शहर पोलिसांतर्फे घेण्यात येत आहे.

सव्‍वातीन लाखाचा मुद्देमाल जप्‍त

कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून २२ दारूचे खोके, १०५ लिटर स्पिरिट, दोन मोटारसायकली, १२० लिटर सुट्टी दारू असा जवळपास ३ लाख २७ हजार २८६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com