कुसुंबा परिसरात लाखोचा सुगंधी पानमसाला, गुटखा जप्‍त

कुसुंबा परिसरात लाखोचा सुगंधी पानमसाला, गुटखा जप्‍त
कुसुंबा परिसरात लाखोचा सुगंधी पानमसाला, गुटखा जप्‍त
Dhule policesaam tv

धुळे : गुटखा, पानमसाला विक्रीवर बंदी असताना अवैधरित्‍या वाहतुक व विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशाच प्रकारे अवैधरित्‍या वाहतुक होत असलेल्‍या गुप्‍त माहितीच्‍या आधारावर धुळे पोलिसांनी (Dhule Police) केलेल्‍या कारवाईत सुंगधी पानमसाला व गुटखा पोलिसांनी जप्‍त केला. (dhule news police action fragrant Panamsala and gutkha seized in Kusumba area)

Dhule police
St Strike: एसटीची याचिका सुनावणी लांबली; धुळ्यात कर्मचारी संपावर कायम

कुसूंबा ते मालेगाव (Malegaon) रस्त्यावरून महाराष्ट्र राज्यात बंद असलेल्या गुटख्याची अवैधपणे वाहतूक केली जाणार असल्याची गुप्त माहितीदारामार्फत धुळे तालुका पोलिसांना माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे धुळे तालुका पोलिसांनी (Police) या मार्गावर सापळा रचला असता या दरम्यान मिळालेल्या माहितीतील संबंधित वाहन समोर येताच पोलिसांनी तात्काळ ते थांबवले. वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधी पानमसाला व गुटखा पोलिसांना आढळून आला.

९ लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्‍त

जप्‍त केलेल्‍या गुटख्‍याची बाजारामध्ये किंमत जवळपास ४ लाख २४ हजार २७० इतकी मानली जात आहे. या कारवाईदरम्यान दोघांच्या पोलिसांनी मुसक्या देखील आवळल्या आहेत. या कारवाई दरम्यान गुटखा वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे वाहनासह जवळपास ९ लाख ४ हजार २७० इतका मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.