धुळ्यात वाहनांची झाड़ाझड़ती; कागदपत्रांचीही होतेय तपासणी

धुळ्यात वाहनांची झाड़ाझड़ती; कागदपत्रांचीही होतेय तपासणी

धुळे : गेल्या काही दिवसांपासून धुळ्यामध्ये वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलीस प्रशासन वाहन चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सज्ज झाल्याचे बघावयास मिळत आहे. (dhule-news-police-bike-and-vehical-cheaking-in-robbery-case)

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने एक दिवसापूर्वी शिरपूर येथून वाहन चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या होत्या. धुळ्यात देखील आज पोलीस प्रशासनातर्फे दुचाकींची कसून तपासणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. पोलीस प्रशासनातर्फे धुळे शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करून दुचाकी धारकांची कसून तपासणी केली जात आहे.

कागदपत्रांची तपासणी

यादरम्यान वाहनधारकांच्या कागदपत्रांमध्ये कुठल्याही प्रकारची तफावत आढळून येत असेल अशा वाहनांना ताब्यात घेऊन त्यांची संपूर्ण शहानिशा करूनच वाहने वाहन धारकांच्या ताब्यात देण्यात येत आहे. पोलीस प्रशासनातर्फे सुरू असलेल्या नाकाबंदी व वाहन तपासणीमुळे वाहन चोरी करणाऱ्या चोरट्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

Related Stories

No stories found.