Dhule: पोलिसांनी उधळला नशेचा बाजार; दोघांना घेतले ताब्‍यात

पोलिसांनी उधळला नशेचा बाजार; दोघांना घेतले ताब्‍यात
dhule police
dhule policesaam tv

धुळे : शहरातील चाळीसगाव रोड पोलिसांना मिळालेल्‍या माहितीवरून केलेल्‍या कारवाईत नशेच्‍या बाटल्‍या आढळून आल्‍या. पोलिसांनी या बाटल्‍या जप्‍त करत दोन जणांना ताब्‍यात घेतले आहे. (dhule news Police raid drug market Both were taken into custody)

dhule police
पतंग उडविण्याचा आनंद क्षणात विरला; चिमुकल्‍याचा मृत्‍यू

धुळे (Dhule) शहरातील चाळीसगाव रोड पोलीस (Dhule Police) ठाण्याच्या गजानन कॉलनी परिसरात काही व्यक्तींकडून नशेचे अनोख्या प्रकाचे द्रव्य विक्री केले जात होते. याबाबतची माहिती चाळीसगाव (Chalisgaon) रोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता या छाप्या दरम्यान पोलिसांना विविध नशेच्या बाटल्यांमधून नशा येणारे द्रव्य आढळून आले आहे.

५८ हजाराचा मुद्देमाल

पोलिसांच्‍या (Police) कारवाईत जवळपास ४८२ नशेच्या बाटल्या पोलिसांना आढळून आल्या. ज्यांची बाजारात जवळपास ५८ हजार ५६० रुपये इतकी किंमत मानली जात आहे. यासंदर्भात चाळीसगाव रोड पोलिसांनी दोघांच्‍या मुसक्या आवळल्या. तसेच हा नशेचा बाजार चालविण्यासाठी उपयोगात येत असलेल्या या नशेचा बाटल्या कुठून व कशा पद्धतीने आणत होते. याचा पुढील तपास चाळीसगाव रोड पोलिस करीत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com