कत्तलीच्या हेतूने बांधुन ठेवलेली गोवंश जातीच्या जनावरांची सुटका; दोघे ताब्‍यात

कत्तलीच्या हेतूने बांधुन ठेवलेली गोवंश जातीच्या जनावरांसह दोघांच्या आवळल्या मुसक्या
कत्तलीच्या हेतूने बांधुन ठेवलेली गोवंश जातीच्या जनावरांची सुटका; दोघे ताब्‍यात
गोवंश

भूषण अहिरे

धुळे ः शहरातील फिरदोसनगर परिसरातील एका ओपन स्पेसच्या कंपाऊंडमध्ये कत्तलीचा हेतूने गोवंश जातीची जनावरे बांधून ठेवली होती. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली असता त्‍यांनी अचानक धाड टाकत गोवंश जातीच्‍या जनावरांसह दोघांना ताब्‍यात घेतले. (dhule-news-police-Release-of-cattle-bound-for-slaughter)

चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना खात्रीदायक सुत्रांकडून सदरची माहिती समजली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कारवाईसाठी एक पथक तयार करून सदर ठिकाणी पाठवले. संबंधित ठिकाणी गेलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना गोवंश जातीची जनावरे आढळून आली. तसेच त्याठिकाणी दोन संशयित देखील पोलिसांना आढळून आले. पोलिसांना बघताच या दोघा संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु सिनेस्टाईल पाठलाग करून या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले.

गोवंश
नंदुरबारला नवीन आलेल्या अधिकाऱ्यांचा असाही योगायोग

नऊ गोवंश ताब्‍यात

सदर कारवाईमध्ये तब्बल ७५ हजार रुपये किंमतीचे तब्बल नऊ गोवंश जातीची जनावरे पोलिसांनी हस्तगत केले आहेत. ताब्यात घेतलेल्या दोघांविरोधात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com