Dhule: पोलिसांनी जप्त केला लाखोंचा गुटखा

पोलिसांनी जप्त केला लाखोंचा गुटखा
Dhule: पोलिसांनी जप्त केला लाखोंचा गुटखा
Dhule NewsSaam tv

धुळे : महाराष्ट्र राज्यामध्ये बंदी असलेला गुटखा अवैधरित्या वाहून नेणाऱ्या ट्रक पकडून यातील गुटख्याचा मोठ्या प्रमाणात साठा मोहाडी पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच ट्रक चालकावर मोहाडी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला. (dhule news Police seized millions of gutkha)

Dhule News
Akshaya Tritiya: सोने खरेदीचा साधला मुहूर्त

मालेगावकडून (Malegaon) धुळ्याकडे अवैधरित्या मालट्रकमधून वाहून नेला जाणारा लाखो रुपयांचा गुटखा मोहाडी पोलिसांनी जप्त केला आहे. मालेगावकडून येणाऱ्या ट्रकवर संशय बळावल्याने पोलिसांनी ट्रक चालकाला ट्रक थांबवण्यास सांगितले. त्यानंतर ट्रक चालकाला ट्रकमध्ये असलेल्या माला संदर्भात विचारणा केली (Dhule News) असता चालकातर्फे पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली.

सहा लाखाचा गुटखा

पोलिसांनी संशय बळावल्याने ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधी पानमसाला व गुटखा आढळून आला. ट्रकमध्ये जवळपास सहा लाखांहून अधिकचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.