Dhule News: रस्त्यांची दुरावस्था; आक्रमक ग्रामस्थांनी रोखला रस्ता

रस्त्यांची दुरावस्था; आक्रमक ग्रामस्थांनी रोखला रस्ता
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाल्याचे बघावस मिळत आहे. ग्रामस्थांनी साक्री-पिंपळनेर रस्ता (Dhule News) अडवून धरत या ठिकाणी रास्ता रोको केला आहे. ग्रामस्थांच्या या आक्रमक भुमिकेमुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे बघावयास मिळाले आहे. (Maharashtra News)

Dhule News
Health News: धुळे शहरात सात बालके ‘गोवर पॉझिटिव्ह’

साक्री (Sakri) तालुक्यातील पिंपळनेर या ठिकाणी रस्त्यांची गेल्‍या कित्‍येक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून रस्त्यावर धुळीचे देखील मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरले आहे. धुळीचा त्रास नागरिकांना जाणू लागला आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊन देखील कुठल्याही प्रकारची उपाययोजना प्रशासनातर्फे केली जात नाही.

सोशल मिडीयावरून आवाहन

अखेर ग्रामस्थांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून "आम्ही पिंपळनेरकर" या टॅग लाईनसह सोशल मीडियावर रास्ता रोको आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलेले होते. या रास्ता रोकोमध्ये विविध राजकीय संघटना तसेच सामाजिक संघटनांनी देखील आपला सहभाग नोंदवला असून प्रशासनाच्या विरोधामध्ये आक्रमक झालेल्या आंदोलकांनी घोषणाबाजी करून आपला निषेध व्यक्त केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com