केंद्रीय मंत्री दानवेंचा निषेध; नाभिक समाजाचे निदर्शने

केंद्रीय मंत्री दानवेंविरोधात निषेध; नाभिक समाजाचे निदर्शने
Dhule Collector Office
Dhule Collector OfficeSaam tv

धुळे : केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावताना नाभिक समाजाची भावना दुखावणारे शब्द वापरले. याचे पडसाद धुळ्यात उमटले असून नाभिक समाजातर्फे जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर (Dhule Collector Office) निदर्शने करत दानवे यांचा निषेध केला. (Dhule news Protest against Minister ravsaheb Danve)

Dhule Collector Office
थरार..वाढदिवसाच्‍या जेवणाची ऑर्डर जीवावर बेतली; सिलिंडर स्‍फोटात आचारीचा मृत्‍यू

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Ravsaheb Danve) यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री तिरुपती बालाजी येथील नाभिकांप्रमाणे अर्धवट काम करीत असल्याचे बोलत टोला लगावला. यातून नाभिक समाजाच्या भावना दुखावल्याचे काम मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले असल्याचे म्हणत दानवे यांनी नाभिक समाजाची माफी मागावी. या मागणीचे धुळे (Dhule) शहर नाभिक समाज संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

अन्‍यथा जनआंदोलन

मंत्री रावसाहेब दानवे यांचा निषेध करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करून मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला आहे. तसेच नाभिक समाजाची माफी मागावी; अन्यथा मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जनआंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेतर्फे निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com