धुळ्यात दरेकरांच्‍या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध; शेण चोपडून जाळली प्रतिमा

धुळ्यात दरेकरांच्‍या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध; शेण चोपडून जाळून प्रतिमा
Dhule ncp
Dhule ncp

धुळे : विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्‍तव्‍याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी निषेध करत दरेकर यांच्‍या प्रतिमेस शेण चोपडून प्रतिमा जाळली. (dhule-news-Protesting-pravin-Darekar-controversial-statement-in-Dhule-Images-of-burning-dung)

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुणेतील शिरूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्यावतीने निषेध करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या महिला कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या प्रतिमेस शेन चोपडून व त्यांची प्रतिमा जाळून त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.

Dhule ncp
पक्षातील गटबाजीवर अजितदादांचा ‘डोस’

पोस्‍टातून रोज पाठविणार निषेध पत्र

निषेध करताना महिला कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रवीण दरेकर यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करीत आपला संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर आज पासून दररोज प्रवीण दरेकर यांना पोस्टातून निषेध पत्र पाठवून रोज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी यांचा निषेध करतील; असे देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com