नुकसानग्रस्‍तांना लवकरात लवकर मदत; आमदार कुणाल पाटलांचे आश्‍वासन
MLA Kunal patil

नुकसानग्रस्‍तांना लवकरात लवकर मदत; आमदार कुणाल पाटलांचे आश्‍वासन

नुकसानग्रस्‍तांना लवकरात लवकर मदत; आमदार कुणाल पाटलांचे आश्‍वासन

धुळे : मुसळधार पावसामुळे शेतीतील पिकांचे तसेच घरांचे नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व घरांची पडझड झालेल्यांना लवकरात लवकर मदत देण्याचे आश्‍वासन आमदार कुणाल पाटील यांनी दिले. (dhule-news-Provide-immediate-assistance-to-the-victims-Assurance-of-MLA-Kunal-Patil)

धुळे तालुक्यासह जिल्ह्यामध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसानंतर बहुतांश ठिकाणी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांची पडझड देखील झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले असून यासंदर्भात धुळे ग्रामीणचे आमदार तथा आज काँग्रेस कमिटीच्या राज्य कार्यकारणीमध्ये सामील झालेल्या कुणाल पाटील यांनी संबंधित प्रशासनाला याबाबत आदेश दिले. तसेच तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यामधील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्याचबरोबर नुकसानग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठविण्याचे आदेश संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत

MLA Kunal patil
साताऱ्यात राडा; नगरसेवकाच्या समर्थकांनी युवकास चाेपले, ६ गंभीर

नुकसानीची रक्‍कम खात्‍यात

महाविकास आघाडी सरकार हे शेतकर्‍यांच्या व नागरिकांच्या पाठीशी असल्याचे म्हणत पावसामुळे नुकसान झालेल्या सर्वच नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. नुकसानग्रस्त नागरिकांच्या खात्यावर लवकरच पंचनामा नुसार मदत महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून दिली जाईल असेदेखील आश्वासन यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी नागरिकांना दिले आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com